जब जागे तब सबेरा! IPS अधिकाऱ्यानं चक्क ‘वजन’ घटवलं, लॉकडाऊनमधली प्रेरणादायी बातमी

IPS झाल्यानंतर विवेकराजसिंग ट्रेनिंगसाठी हैदराबादच्या राष्ट्रीय अकादमीत (NPA) ज्वाईन झाले. त्यावेळेस त्यांचं वजन होतं 134 किलो. (overeating overweight IPS weight loss )

जब जागे तब सबेरा! IPS अधिकाऱ्यानं चक्क 'वजन' घटवलं, लॉकडाऊनमधली प्रेरणादायी बातमी
Vivek Raj Singh Kukrele
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:58 AM

हैदराबाद : कोरोनाचं संकट सुरु झालंय तेव्हापासून बहुतांश जणांना ‘वजनदार’ असणं किती धोकादायक आहे, याचा अंदाज आणि अनुभव दोन्ही येतं आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशी मंडळी वजन घटवण्यासाठी प्रयत्न करतायत पण त्यात सर्वांनाच यश येतंय असं नाही. त्यामुळेच IPS विवेकराजसिंग कुकरेले (Vivek Raj Singh Kukrele) यांची वजन घटवण्याची बातमी प्रेरणादायी आहे. ती तुम्हाला मदतही करु शकते. (overeating overweight IPS shares inspirational FB post weight loss journey)

IPS झाल्यानंतर विवेकराजसिंग ट्रेनिंगसाठी हैदराबादच्या राष्ट्रीय अकादमीत (NPA) ज्वाईन झाले. त्यावेळेस त्यांचं वजन होतं 134 किलो. तोपर्यंत त्यांनी त्यांचं कधी वजनच मोजलेलं नव्हतं. त्यांनी जी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय त्यानुसार ते इयत्ता आठवीत असताना त्यांनी वजन मोजलं होतं आणि त्यावेळेस ते 88 किलो वजनाचे होते. NPA मध्ये त्यांची ट्रेनिंग सुरु झाली. IPS च्या खडतर ट्रेनिंगमध्ये त्यांचं शरीर पघळायला सुरुवात झाली. 46 आठवड्यांच्या कठिण ट्रेनिंगनंतर विवेकराजसिंग हे 134 किलोवरुन थेट 104 किलोवर आले.

नंतर वजन पुन्हा का वाढलं?

एनपीएतून बाहेर पडल्यानंतर विवेकराजसिंग कुकरेले यांचं वजन कायम नाही राहीलं. फेसबूक पोस्टमध्ये ते म्हणतात की, बिहारमध्ये नक्सल भागात नोकरी करताना माझं वजन पुन्हा वाढलं. एक दोन किलो नाही तर ते पुन्हा 138 किलो पर्यंत गेलं. म्हणजेच एनपीएत ज्वाईन होताना ते 134 किलोंचे होते तर आता नोकरी करत असताना 138 किलोंचे. असं का घडलं? विवेकराज म्हणतात की, ओव्हरइटींग म्हणजेच अती खाणं हाच दोष होता. मी फुडी आहे. अन्न फेकू नये (Khana fikna nahi chahiye) हाच माझा कायम मोटो होता. कसलंही डोकं न लावता खात राहणे आणि कितीही खात राहणे सुरु होतं. परिणामी 9 वर्षे त्यांचं वजन 130 किलो होतं. 9 किलो वजन कमी करण्यात विवेकराज यांना यश आलं.

अती वजनाचे धोकादायक परिणाम

अती वजन हे धोकादायक ठरतच. ते तुम्हाला स्तुल बनवतं. बीपी वाढवतं, शुगरचं संकट आणू शकतं. विवेकराजसिंगही त्यातून सुटले नाहीत. फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात की, त्यांना बीपीचा त्रास सुरु झाला, तो कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यांना औषधं घ्यावी लागली. हायपरटेन्सिव हा आणखी एक त्रास. हे सगळं अती वजनाचे परिणाम होते. पण नंतर त्यांनी जसही वजन कमी केलं, तसा त्यांचा बीपी नॉर्मल झाला. रेस्टिंग पल्स रेट आता 40 BPM एवढा आहे.

बदलाची सुरुवात कशी झाली?

तुम्ही ओव्हरवेट असणं हा काही गुन्हा नाही पण ते धोकादायक होत असताना तशाच स्थितीत राहणं जीवघेणं ठरु शकतं. त्यामुळेच बदल महत्वाचा. विवेकराज म्हणतात की, एका ऑफिशीयल असाईनमेंटवर असताना, अचानक मी चालायला सुरुवात केली आणि चालतच राहीलो. Step Set Go नावाचं वॉकिंग अॅप त्यासाठी महत्वाचं ठरलं. चालणं हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला. हळूहळू माझं वजन कमी व्हायला लागलं. जसही वजन कमी व्हायला लागलं तसं मी ऊर्जा मिळवण्यासाठीची खास ट्रेनिंग सुरु केली. त्यातच डोकं ठिकाण्यावर ठेऊन खायला लागलो. परिणामी वजन आणखी कमी होत गेलं. गेल्या काही महिन्यांपासून डाएटही सुरु केलं आहे, त्यामुळे माझं शरीर टोन होतं आहे आणि चांगल्या शेपमध्येही येत आहे. फेसबुकवरचा FITTR ह्या ग्रुपनेही न्यूट्रीशन समजून घेण्यासाठी मदत केली. परिणामी कुठल्याही औषध गोळ्यांशिवाय बीपी नॉर्मल.

कुकरेजा यांची फेसबुक पोस्ट :

संबंधित बातम्या :

फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास

Avika Gor | ‘बालिका वधू’चा ग्लॅमरस अंदाज, 13 किलो वजन घटवलं, अविका गौर ओळखूही येईना

(overeating overweight IPS shares inspirational FB post weight loss journey)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.