नवी दिल्ली : आज संपूर्ण देशात पवित्र रक्षा बंधनाचा सण साजरा होतोय. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने रक्षा बंधन साजरं केलं. सीमाने मंगळवारी रक्षा बंधनाचा सण साजरा केला. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबद्दल मोठा गदरोळ झाला होता. ती नेपाळमार्गे बेकायदरित्या भारतात दाखल झाली. सीमा हैदरची यूपी ATS कडून चौकशी सुद्धा झाली. सुरुवातीला ती हेर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलं. सीमाच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. तिला कॉम्प्युटरची सुद्धा चांगली जाण आहे. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. सीमा हैदर पबजी हा ऑनलाइन गेम खेळता खेळता सचिन मीनाच्या प्रेमात पडली.
त्यासाठी तिने तिच्या नवऱ्याला सोडलं. चार मुलांना घेऊन ती भारतात आली. भारतीय वृत्तवाहिन्यांवर तिने सातत्याने मुलाखती दिल्या. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा होती. सीमा हैदरवर बेकायदरित्या भारतात दाखल झाल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात जायच नाहीय. पाकिस्तानात आपल्या जीवच बर-वाईट होण्याची भिती तिला आहे. तिला भारतातच रहायच आहे. सीमा हैदराने तिची ही इच्छा बोलून सुद्धा दाखवलीय, पण अनेक कायदेशीर पेच आहेत. सीमा हैदरवर एक सिनेमा सुद्धा येऊ घातलाय.
पायाला स्पर्श करुन घेतला आशिर्वाद
आज संपूर्ण देशात पवित्र रक्षा बंधनाचा सण साजरा होतोय. या प्रसंगी सीमा हैदरला भारतात एक भाऊ मिळालाय. सीमाचा हा भाऊ कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सीमाने तिचे वकील एपी सिंह यांच्या मनगटावर राखी बांधली. सीमाने नवरा सचिन आणि कुटुंबातील सदस्यांसोबत रक्षा बंधनाचा सण साजरा केला. सीमा हैदरने एपी सिंह यांना राखी बांधली व त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला.
तिच्या मुलांना मिठाई भरवली
एपी सिंह सीमा हैदरची कायदेशीर बाजू संभाळत आहेत. ते सचिन मीणाच्या कुटुंबाला ओळखतात. सीमाने त्यांच्या हातावर राखी बांधली. सोशल मीडियावर सीमाचे हे फोटो व्हायरल होतायत. एपी सिंहने सीमा आणि तिच्या मुलांना मिठाई भरवली. मला खूप समाधान आहे, एपी सिंह यांच्यासारखा मोठा भाऊ मिळाला असं सीमाने सांगितलं.
सीमा कुठल्या नेत्यांना राखी पाठवलीय?
सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोद, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली आहे. सीमा हैदर भारतात आल्यापासून चर्चेत आहे. चित्रपट निर्माते अमित जानी सीमावर चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या सगळ्यामध्ये सीमावर येणाऱ्या चित्रपटाचा पोस्ट रिलीज झाला आहे.