कोंबडीला हिरवा रंग दिला, नंतर पोपट म्हणून ऑनलाइन विकला, कमेंट पाहून हसू आवरेना
viral news | सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने कोंबडीला हिरवा रंग दिला आहे. त्याचबरोबर ऑनलाईने तो पोपट असल्याचं सांगून विकला आहे. पोस्टच्या खाली आलेल्या कमेंट पाहून अनेकांना हसू आवरेना अशी स्थिती आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. काही लोकं अशा पद्धतीचा जुगाड (jugaad) करीत आहेत, लोकांना ती गोष्ट पाहिल्यानंतर हसू देखील कंट्रोल होत नाहीये. ज्यावेळी एका व्यक्तीचा कारनामा बाहेर आला त्यावेळी लोकांना प्रचंड हसू आलं आहे. पाकिस्तानमधील (pakistan) एका व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या कोंबडीला हिरवा रंग दिला, त्यानंतर त्याचा ऑनलाईन विक्री केली. हा विषय सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेचा ठरला आहे. तुम्हाला सुध्दा हा प्रकार कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका कोंबडीला हिरवा रंग दिल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे कलर देऊन कोंबड्याला पोपट म्हणून विकला आहे. हा प्रकार पाकिस्तानमध्ये घडला असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. परंतु हा प्रकार पाकिस्तानमध्ये घडल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्या पोस्टला सोशल मीडियावर मजेशीर कमेंट येत आहेत. काही त्या फोटोला तयार केल्याचं सोशल मीडियावर म्हणत आहेत.
व्हायरल होत असलेल्या त्या पोस्टमध्ये हिरव्या रंगाचा एक पक्षी दिसत आहे. तो कोंबडी सारखा दिसत आहे. परंतु त्याला पोपट असल्याचं सांगितलं जातं आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीने कोंबड्याला हिरवा रंग देऊन पोपट असल्याचं सांगून साडेसहा हजार रुपयाला विकला आहे. ती व्यक्ती कराचीतील असून त्या व्यक्तीने फोटो काढून OLX टाकला होता.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेला फोटो इंस्टाग्रामवरती divamagazinepakistan नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या पोस्टला आत्तापर्यंत 22 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेक लोकांनी त्या पोस्टला कमेंट सुध्दा केल्या आहेत.