पाकिस्तानच्या या गायकाचं वर्ल्ड कप साँग ऐकाल तर हसून हसून पुरती वाट लागेल video viral

क्रिकेट वर्ल्ड कपचा फिव्हर सुरु झाला असून पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला शुभेच्छा देणाऱ्या चाहत फतेह अली खान या नावाच्या गायकाचे वर्ल्ड कप साँग प्रचंड व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या या गायकाचं वर्ल्ड कप साँग ऐकाल तर हसून हसून पुरती वाट लागेल video viral
chahat Fateh ali khan songImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 2:31 PM

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : क्रिकेटची आवड असणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली असून आजपासून वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कपला ( ODI World Cup ) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व देशाच्या आणि तेथील चाहते टीम वर्ल्ड कप ( Worlds Cup ) साठी उत्साहीत आहेत. या क्रिकेटच्या मॅचेससाठी अनेकांना भारत आणि पाकिस्तान या देशांच्या दरम्यान होणाऱ्या मॅचेस म्हणजे मनोरंजनाची फूल मेजवाणीच असते. एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील चाहते या मॅचेसची वाट पहात असताना पाकिस्तानातील एका गायकाचे वर्ल्ड कप गाणे खुपच व्हायरल झाले आहे. चाहत फतेह अली खान नावाच्या या स्वत:ला गायक म्हणणाऱ्या गायकाचे गाणं ऐकून हसून हसून तुमची पुरती वाट लागेल.

पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला शुभेच्छा देणाऱ्या चाहत फतेह अली खान या विचित्र नावाच्या गायकाचे वर्ल्ड कप साँग प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात हा गायक मजेशीर अंदाजात आपल्या पाकिस्तानी टीमला शुभेच्छा देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून त्यास एक दशलक्षहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडीओत चाहत फतेह अली खान पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला चिअर करताना दिसत आहे. चाहत फतेह अली खान ‘जीतेंगे भाई जीतेंगे’ असे गाताना दिसत आहे. या व्हिडीओला पाकिस्तानी गायक अली जफर यानी देखील शेअर केले आहे. अली जफर यांनी यावर लिहीले आहे की, ‘ ये नही हो सकता, त्यांनी माझ्या बिझी शेड्यूलचा फायदा उचलला आहे. हे बरोबर नाही. यांची बरोबरी कधी होऊ शकत नाही.’

येथे व्हिडीओ पाहा –

मजेशीर कमेंट मिळत आहेत

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत. एका युजरने म्हटलेय, कमाल टेलेंण्ट है भाई, इसे छीपाके रखो ! तर एका युजरने म्हटले की हे भगवान, मेरे कान ! तिसऱ्या एका युजरने म्हटले की असे गाणे गाणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास व्हायला हवा. चौथ्या युजरने म्हटले की ब्युटीफुल व्हाईस, गॉड ब्लास्ट यू ! गुरुवारी दुपारपासून क्रिकेटच्या महाकुंभ सुरु होत आहे. पहिली मॅच इंग्लंड आणि न्युझीलंड दरम्यान खेळला जाणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.