2024 मध्ये पाकिस्तानी लोकांनी गुगलवर मुकेश अंबानी यांना सर्वाधिक सर्च का केलं?
2024 मध्ये पाकिस्तानी लोकांनी सर्वाधिक सर्च केलेले विषय कोणते आहेत त्याची यादी गुगलने जारी केली आहे. पाकिस्तानात भारताविषयी गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेले विषय अत्यंत आश्चर्यकारक आहेत.
2024 वर्ष संपायला आता काहीच तास बाकी राहिले आहेत. या वर्षभरात अशा कितीतरी घटना घडल्या आहेत. तसेच लोकांनीही गुगलवर कित्येक गोष्टी सर्च केल्या असतील. त्यानुसार आता गुगलने 2024 मध्ये लोकांनी कोणत्या गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत याची यादी जाहिर केली आहे. त्यात भारतातील लोकांनी इंटरनेटवर काय सर्च केलं या यादीसह पाकिस्ताननेदेखील गुगलवर सर्वाधिक सर्च काय केलं आहे याचा डेटा जारी केला आहे.
पाकिस्तानने गुगलवर सर्वाधित सर्च केलेले विषय
पाकिस्तानने गुगलवर सर्वाधित सर्च केलेला विषय पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2024 च्या गुगल सर्च लिस्टमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक सर्च केलं आहे मुकेश अंबानी यांना. होय, पाकिस्तानच्या सर्च लिस्टमध्ये मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. गुगलवर पाकिस्तानींनी शोधलेल्या प्रश्नांमध्ये मुकेश अंबानी यांची नेटवर्थ सर्वाधिक सर्च केली गेली असल्याचं समोर आलं आहे.
पाकिस्तानच्या सर्च लिस्टमध्ये मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर
यावरूनच समजतं की अब्जाधीश असलेले मुकेश अंबानी केवळ आपल्या देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की 2024 च्या गुगल सर्च लिस्टमध्ये त्यांच्याविषयीच्या गोष्टी आता पाकिस्तानच्या सर्च लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानी लोकांनी गुगलवर मुकेश अंबानींच्या अनेक गोष्टी शोधल्या आहेत. लोकांनी केवळ त्याची संपत्तीच नाही तर कुटुंबापासून लग्नापर्यंतचे तपशीलही शोधले.तसेच यामध्ये मुकेश अंबानींचा मुलगा, दुसरा अंबानींच्या मुलाचा विवाह आणि मुकेश अंबानींच्या घराचाही समावेश आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती आणि नेटवर्थ सर्वाधिक सर्च करण्यात आली आहे.
पाकिस्तानी लोकांनी भारताबद्दल अजून काय गोष्टी सर्च केल्या आहेत?
मुकेश अंबानींच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या लोकांनी भारताबाबत इतरही अनेक गोष्टी शोधल्या. या यादीत भारतीय चित्रपट, शो आणि नाटक एवढच नाही तर हिरामंडी या वेब सिरीजबदद्लही अनेक गोष्टीही सर्च केल्या आहेत. तसेच 12वी फेल, ॲनिमल, स्त्री 2, मिर्झापूर या चित्रपटांबद्दल सर्च केलं गेलं तसेच बिग बॉसबद्दलचे अपडेट पाहण्यासाठी सर्च केल गेलं.
तसेच भारताने खेळलेल्या क्रिकेट सामन्यांनबद्दलही पाकिस्तानी लोकांनी सर्च केलं आहे. क्रिकेटपटू शुभमन गिल आणि बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याबद्दलही पाकिस्तानी लोकांनी अनेक गोष्टी सर्च केल्या आहेत.