चरत असलेल्या घोड्यांना तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक, लोकांच्या आरोपामुळं वातावरण तापलं
दोन दिवसापूर्वी पाऊस सुरु झाला असल्यामुळे सगळीकडं आनंदाचं वातावरण असताना, काल तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून दोन घोड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
पालघर : पालघरमध्ये (palghar) दोन मुक्या प्राण्यांचा जीव गेला, या सगळ्याला महावितरण विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. ज्यावेळी दोन घोड्यांचा मृत्यू (Two horses died) झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी परिसरात लोकांची गर्दी झाली होती. उपस्थित लोकांनी संताप व्यक्त केला. ही घटना पालघर मधील वेऊर येथील अंबाडी रोडवर घडली आहे. तिथं पोलिस (palghar police) आणि वनविभागाचे अधिकारी तात्काळ दाखल झाले होते. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. चरत असलेल्या घोड्यांना तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागला त्यामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक
पालघर वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार दोन मुक्या जनावरांच्या जीवावर बेतला असल्याची सगळीकडं चर्चा आहे. तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून दोन घोड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिक तिथं संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. पालघर मधील वेऊर येथील अंबाडी रोडवर चरत असलेल्या दोन घोड्यांना तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून जिल्ह्यात वीज महावितरण विभागाच्या असलेल्या विद्युत वाहिन्या आणि त्यांचे खांब यांची दुरावस्था झालेली असताना देखील पावसाळाआधी त्यांच्या दुरुस्तीची काम हाती न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातं आहे.
नागरिकांचा भयानक आरोप
महाराष्ट्रात पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाकडून संपूर्ण विद्युत वाहिनीची तपासणी केली जाते. त्याचबरोबर ज्या भागात उंच झाडे आहेत. त्या झाडांचा विद्युत वाहिणीला पावसाळ्यात अडचणं होऊ शकतं, अशी झाडं तोडली जातात. परंतु पालघरमध्ये अशा पद्धतीची काम केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.