नोकऱ्या काय करत बसलाय.. तुमच्यापेक्षा हा पाणीपुरीवाला बक्कळ कमावतो; एका दिवसाची कमाई पाहून थक्क व्हाल

पाणीपुरी... नुसतं नाव काढलं तरी अनेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लोकांना पाणीपुरी खायला आवडत असलं तरीही पाणीपुरी विकणं हे बऱ्याच लोकांना कमीपणाचं काम किंवा लक्षण वाटतं. पण या पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकाल तर...

नोकऱ्या काय करत बसलाय.. तुमच्यापेक्षा हा पाणीपुरीवाला बक्कळ कमावतो; एका दिवसाची कमाई पाहून थक्क व्हाल
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 12:39 PM

pani puri seller income : पाणीपुरी… नुसतं नाव काढलं तरी अनेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. गरमागरम रगडा, आंबट गोड आणि तिखट चटणी असलेली ती पुरी तोंडात जाताच ब्रह्मानंदी टाळी लागते. लोकांना पाणीपुरी खायला आवडत असली तरीही पाणीपुरी विकणं हे बऱ्याच लोकांना कमीपणाचं काम किंवा लक्षण वाटतं. पण पाणीपुरी विकणं हा बिझनेस फायद्याचा नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाणीपुरी वाल्याने त्याची कमाई लोकांना स्वत: सांगितली आहे. त्याने सांगितलेला आकडा ऐकून लोकं तर हैराण झाले आहेत.

एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एका पाणीपुरीवाल्याशी संवाद साधला आहे. तुझी एका दिवसाची कमाई किती ? असा प्रश्न त्याने त्याला विचारला. त्यावर तो ( पाणीपुरी विक्रेता) म्हणाला, दिवसभरात साधारण 2500 रुपयांची कमाई होते. हा व्हिडीओ 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पण त्या पाणीपुरी विक्रेत्याने त्याचं नाव काही उघड केलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Vijay (@vijay_vox_)

या व्हिडीओवर शेकडो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. बहुतांश युजर्स हे त्याची कमाई ऐकून तर हैराणच झाले. ‘ते खूप मेहनत करतात. त्यांना सगळे पदार्थ स्वत: तयार करावे लागतात आणि दिवसभर उभं राहून पाणीपुरी विकावी लागते,’ अशी कमेंट एकाने केली. तर ‘हे प्रचंड कठीण काम आहे. वातावरण कधी खूप गरम असतं, तर कधी थंडगार वारा वाहत असतो, पाऊसही कोसळतो. बऱ्याच वेळेस चोरच पैसे घेऊन पळून जातात. एखाद्या इमारतीत बसून काम करणं सोपं आहे. पण रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी विकणं हे काही खायचं काम नाही’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने त्या पाणीपुरी विक्रेत्याचं कौतुक केलं.

तिसऱ्या युजरने तर हा व्हिडीओ बनवणाऱ्या माणसालाच झापलं. ‘ (तुमचं) हे वागणं खूप चुकीचं आहे. हा व्हिडीओ पाहून त्याला कोणी लुटलं वगैरे तर ? (तुम्ही) कमीत कमी त्याचा चेहरा तरी ब्लर करायला हवा होतात. ते खूप मेहनत करतात आणि तुम्ही त्यांची ओळख अशी जगजाहीर करून त्यांचं आयुष्य धोक्यात टाकत आहात’ असं त्या युजरने सुनावलं.मात्र, बऱ्याच लोकांनी तर त्याची कमाई जाणून घेतल्यावर आनंदही व्यक्त केला. काहींनी तर त्याची महिन्याची कमाई आणि वार्षिक कमाईचेही कॅलक्युलेशन केले. एका दिवसाला 2500 रुपये कमावत असेल तर महिन्याचे 75000 रुपये झाले, असे एकाने सांगितले.

विक्रेत्याची मासिक कमाई कळल्यानंतर अनेकांनी आनंदही व्यक्त केला. तो म्हणाला की कदाचित एकूण खर्च आणि बचत यात गोंधळ झाला आहे. अनेकांनी गोलगप्पा विक्रेत्याची मासिक आणि वार्षिक कमाई मोजली. तो म्हणाला की जर तो दिवसाला 2500 रुपये कमावतो. त्यामुळे महिन्याचे 75000 रुपये झाले. त्याच वेळी, काही लोकांनी सांगितले की त्याला कर आणि दुकानाचे भाडे भरावे लागत नाही, त्यामुळे त्याने चांगली कमाई केली असावी. पण त्याला टॅक्स आणि दुकानाचं भाडं द्यावं लागत नाही, त्यामुळेही तो चांगलं कमावत असेल, असे एका युजरने म्हटलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.