मुंबई: गोलगप्पा किंवा पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? रस्त्याच्या कडेला पाणीपुरीची गाडी दिसताच लोकांच्या तोंडून पाणी येते. पण आपल्या सर्वांच्या लाडक्या या स्ट्रीट फूडवर आता फ्युजनच्या नावाखाली अत्याचार केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो याचा पुरावा आहे. हे पाणीपुरीचं मेन्यू कार्ड आहे. हे पाहून तुम्हाला मळमळ होऊ शकते. लोकांचा विश्वास बसत नाही की कोणी अशा प्रकारे पाणीपुरी बनवू शकतं.
एकेकाळी लोकांना आंबट-तिखट आणि गोड पाण्याची पाणीपुरी आवडायची. पण पश्चिम बंगालमधील स्ट्रीट फूड विक्रेते बराच पुढे गेल्याचे दिसते. इथे एक पाणीपुरीवाला भैय्या लोकांना चिकन-मटण गोलगप्पा खायला घालत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकसुद्धा ते आवडीने खात आहेत. या दुकानाच्या मेन्यूचा एक फोटो शेअर केला आहे, जो बंगालमधील एका दुकानातील असल्याचे सांगितले जात आहे. आता हा मेन्यू वाचून लोक हैराण झाले आहेत.
रितुपर्णा यांनी @MasalaBai हँडलवरून लिहिलं आहे की, बंगाल आणि तिथली जनता खूप पुढे गेली आहे असं वाटतं. मेन्यू नुसार इथल्या दुकानात चिकन आणि मटणा व्यतिरिक्त तुम्हाला कोळंबी पाणीपुरीही दिली जाणार आहे. याशिवाय गोलगप्प्याचे आणखी ही काही प्रकार आहेत.
Have Bengalis and Bengal gone too far? pic.twitter.com/ZdyIxf0ahu
— Rituparna Chatterjee (@MasalaBai) June 11, 2023
एकाने लिहिले की, “अशी आश्चर्यकारक माणसे कुठून येतात? तर दुसरा म्हणतो, गोलगप्पांवर असा अत्याचार होऊ शकतो, असं मला वाटलंही नव्हतं. आणखी एका युजरने लिहिले की, ” हे बॉनलेस आहे का?”.