Kacha Badam गाण्यावर थिरकला Paris boy; यूझर्स म्हणतायत, भावा, भारतात ये, कमालीचा Dance करतोस!

Dance on Kacha Badam : गेल्या काही महिन्यांपासून Kacha Badam गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच पॅरिसमधील (Paris) एका मुलाने या गाण्यावर जबरदस्त डान्स (Dance) स्टेप्स केल्या आहेत. भुबन बद्याकरने (Bhuban Badyakar) हे गाणे गायले आहे.

Kacha Badam गाण्यावर थिरकला Paris boy; यूझर्स म्हणतायत, भावा, भारतात ये, कमालीचा Dance करतोस!
पॅरिसमध्ये कच्चा बदामवर थिरकला मुलगाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:17 PM

Dance on Kacha Badam : गेल्या काही महिन्यांपासून Kacha Badam गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्याच्या तालावर नाचत आहेत. आता हे गाणे परदेशातही लोकांना नाचायला लावत आहे. अलीकडेच पॅरिसमधील (Paris) एका मुलाने या गाण्यावर जबरदस्त डान्स (Dance) स्टेप्स केल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायले नसून हातगाडीवर वस्तू विकणाऱ्या भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) या व्यक्तीने गायले आहे. भुबन मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. हे गाणे व्हायरल झाल्यानंतर भुबन रातोरात लोकप्रिय झाला आहे. आता तो सेलिब्रिटी झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पॅरिसमधील एक मुलगा ‘कच्छा बदाम’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. या मुलाला नाचताना पाहून तो दुसऱ्या देशाचा असेल असे वाटत नाही.

इन्स्टाग्रामवर अपलोड

मुलाने गाण्याच्या लोकप्रिय हुक स्टेप्स खूप छान केल्या आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. विशेषतः भारतीय यूझर्स या मुलाच्या डान्सचे वेडे झाले आहेत आणि त्याचे जोरदार कौतुक करत आहेत. कच्चा बदाम या गाण्यावरचा हा धमाकेदार डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर jikamanu नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका भारतीयाला टॅग करत पॅरिसच्या या मुलाने कॅप्शनमध्ये लिहिले, पॅरिसमधील कच्चा बदाम.

वेधले लक्ष

काही तासांपूर्वी अपलोड झालेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. खासकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय या पॅरिसच्या मुलावर आपले प्रेम व्यक्त करत आहेत. आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. तर अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यूझर्सकडून कौतुक

एका यूजरने कमेंट करत लिहिले, भावा, कच्च्या बदामाच्या गाण्यावर जोमाने डान्स करून आग लावली. त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले आहे, की, भावा, तुमचे सर्व डान्स व्हिडिओ अप्रतिम आहेत. दुसरा यूझर म्हणतो, की भावा, तू भारतात ये, अप्रतिम डान्स करतोस.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

आणखी वाचा :

Viral video : अंगठ्यातून काढली साखर, पुन्हा पुन्हा पाहूनही कळणार नाही जादुगाराची कमाल!

हाती घेऊन अक्षरं गिरवण्यास शिकलो, ती पेन्सिल तयार होते तरी कशी? पाहा ‘हा’ Informative short video

यांना तर उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे, युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्मादी वर्तनावर लोक भडकले

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.