काय म्हणायचं आता? पेटीएमने भीक मागून जमवली लाखोंची प्रॉपर्टी; लवकरच हेलिकॉप्टर विकत घेणार
झुनझुन बाबाने पेटीएमने भीक मागून मागून लाखो रुपये जमवले आहेत. त्याच पैशांतून त्याने लाखोंची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या बाबाला हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे. एका व्यक्तीने या बाबाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भोपाळ : संपूर्ण भारत डिजिटल झाला आहे मग भिकारी देखील कसे मागे राहतील. भिकारी देखील आता डिजिटल झाले असून ते ऑनलाईन पेमेंटमोड द्वारे भीक मागताना दिसत आहेत. अशाच एका डिजिटल भिकाऱ्याचा(Digital beggar) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेटीएम(Paytm) ने भीक मागून त्या भिकाऱ्याने लाखोंची प्रॉपर्टी जमा केली आहे. आता लवकरच हा भिकारी हेलीकॉप्टर(helicopter) खरेदी करणार आहे. सोशल मीडियावर भिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे झुनझुन बाबा असे या भिकाऱ्याचे नाव आहे. झुनझुन बाबा हा मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सुरखी येथील राहणारा आहे. झुनझुन बाबा पेटीएममार्फत भीक मागतो. अशीच भीक मागून त्याने लाखोंची प्रॉपर्टी घेतली आहे आणि आता हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे स्वप्न आहे.
भिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल
झुनझुन बाबाने पेटीएमने भीक मागून मागून लाखो रुपये जमवले आहेत. त्याच पैशांतून त्याने लाखोंची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या बाबाला हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे. एका व्यक्तीने या बाबाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुलाच्या फोन नंबरवर भिकाऱ्याने पेटीएम अकाऊंट ओपन केले
व्हिडिओमध्ये बाबा एक भांड दाखवत आहे. या भांड्यावर एक मोबाईल नंबर लिहीलेला आहे. त्याच्या मुलाच्या फोन नंबरवर बाबाने पेटीएम अकाऊंट ओपन केले आहे. लोकांना हा बाबा कॅश नसल्यास पेटीएमने भीक द्यायला सांगतो. झुनझुन बाबाला गरज असते तेव्हा तो मुलाकडून त्याला हवे तेवढे पैसे घेतो.
ये सागर के सुरखी के झुनझुन बाबा हैं, पेटीएम से भीख लेते हैं, इंदौर, सागर में प्रॉपर्टी है। अकाउंट में लाखों रुपए हैं। बस हैलिकॉप्टर लेने की तमन्ना है, उसे पूरा करना चाहते हैं। ?@sagarcomisioner @GovindSingh_R @bhupendrasingho @bhargav_gopal pic.twitter.com/OQFthutfG4
— Makarand Kale (@makarandkale) August 9, 2022
भीक मागून तब्बल 40-50 लाख रुपये जमवले
झुनझुन बाबाने भीक मागून तब्बल 40-50 लाख रुपये जमवले आहेत. याच पैशातून बाबाने इंदूर आणि सागरमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बाबाला आता फक्त हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तो पैसे जमवत आहे. लोकांकडे भीक मागितल्यावर जर कोणी त्याला पैसे नाहीत असे सांगितले तर तो लगेचच पेटीएम द्वारे पैसे देण्याचा सल्ला देतो. तसेच त्याच्या हातात एक भांडेदेखील आहे. अनेक जन त्याच्या या भांड्यात भरभरुन दान करतात.