लोकल ट्रेनमध्ये लोकांना उभं राहायला जागा मिळत नाही, या व्यक्तीचा जुगाड पाहून…
viral news : सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती सामान ठेवतो त्या जागेवर निवांत झोपली असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : भारतात टॅलेंटची (indian talent) अजिबात कमी नाही असे डायलॉग किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर (video viral) अनेकदा पाहत असतो. विशेष म्हणजे अधिक लोकांनी केलेले जुगाड हे कामाशी संबंधित असतात. भारतात काही लोकं असे आहेत, जे अवघड काम सोप्पं करण्यासाठी जुगाड (jugaad) करत आहेत. अवघड मधलं अवघड काम सुध्दा काही लोकांनी अगदी सोप्प केलं आहे. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ कायम पाहायला मिळतात. जे व्हिडीओ लोकांचे गरजेचे आहेत ते व्हायरल सुध्दा होतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.
त्या व्हायरल फोटोमध्ये एक व्यक्ती लोकलमध्ये सामान ठेवण्याच्या ठिकाणी आरामात झोपली आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्याचं सगळ्यांना माहित आहे. विशेष म्हणजे गर्दीच्यावेळी काही लोकांना ट्रेनमध्ये उभं राहायला जागा नसते. परंतु अशा स्थितीत एक व्यक्ती झोपून प्रवास करीत आहे. त्या व्यक्तीचा जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे.
a little jealous ngl by u/Radiant_Commercial56 in mumbai
हे सुद्धा वाचा
हा सोशल मीडियाच्या रेडिय या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. u/Radiant_Commercial56 या व्यक्तीच्या खात्यावरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटो शेअर करीत असताना त्या व्यक्तीने लिहीले आहे की, खरं बोलत आहे, हे पाहून जलन होत आहे. या फोटोला आतापर्यंत असंख्य लाईक केले आहेत. विशेष म्हणजे हा फोटो इतर सोशल मीडियावर सुध्दा व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तींनी हा फोटो पाहिला त्यांना धक्का बसला असल्याचं कमेंटमध्ये सांगितलं आहे.