VIRAL NEWS : हेल्मेट न घालता स्कूटी चालवणाऱ्या दोन महिला पोलिसांचा फोटो व्हायरल, पाहा काय म्हणाले मुंबई वाहतूक पोलिस?
Mumbai Traffic Police : हेल्मेट न घालता स्कूटी चालवणाऱ्या दोन महिला पोलिसांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलं व्हायरल झाला आहे. त्या फोटोला आलेल्या कमेंटला मुंबई पोलिस उत्तर देत आहे.
मुंबई : पोलिस विभागाकडून (Mumbai Police) सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती ट्रॅफिक नियमांबाबत (Traffic Rule) नेहमी जागृती करण्यासाठी मेसेज करण्यात येतात, त्याचबरोबर व्हिडीओच्या माध्यमातून सुध्दा चांगल्या गोष्टी नागरिकांना सांगितल्या जातात. दोन महिला पोलिस विना हेल्मेट स्कुटी चालवत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यापासून त्या अनेक कमेंट येत आहेत. त्याचबरोबर लोकांनी पोलिस विभागाला अनेक प्रश्न विचारले आहेत. हा मुंबईतला असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. त्याचबरोबर मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटर खात्यावरुन अधिक उत्तरं देण्यात आली आहेत.
हा राहुल बर्मन याच्याकडून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन महिला पोलिस स्कुटीवर बसल्या आहेत. त्याचबरोबर चालक पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यावर हेल्मेट नाही. संबंधित स्कुटी नंबर सुद्धा शेअर करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आम्ही अशा पद्धतीने प्रवास केला तर काय होणार आहे? हे नियमांच्या उल्लंघनमध्ये बसत नाही का?”
MH01ED0659 What if we travel like this ?? Isn’t this a traffic rule violation ?@MumbaiPolice @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/DcNaCHo7E7
— Rahul Barman (@RahulB__007) April 8, 2023
ही पोस्ट आतापर्यंत 67 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिली आहे. मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन उत्तर देण्यात आली आहेत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने ट्विट केलं आहे. त्याला पोलिसांकडून आश्वासन देण्यात आलं आहे की या प्रकरणाची वरिष्ठाकडून चौकशी करण्यतात येईल.
Eastern Express Highway (Dadar)
— Rahul Barman (@RahulB__007) April 8, 2023
दुसरीकडे, लोकांनी कमेंटमध्ये त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले की, ‘व्हिडिओ पुराव्यासह कोर्टात केस दाखल करा.’ दुसरा म्हणाला, “हे अत्यंत चुकीचे आणि नागरिकांवर अन्याय आहे.”