हा Alien तर नाही ना? व्हायरल झालेला भयानक फोटो पाहून सगळ्यांनाच पडला प्रश्न

हा जीव म्हणजे महाकाय असा शार्क मासा आहे. एका मच्छिमाराने 2100 फूट खोलीतून हा शार्क पकडला आहे. हा मासा दिसायला अत्यंत विचित्र आणि भयानक असा आहे.

हा Alien तर नाही ना? व्हायरल झालेला भयानक फोटो पाहून सगळ्यांनाच पडला प्रश्न
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 9:22 PM

नवी दिल्ली : आकाशाचे टोक आणि समुद्राचे तळ अद्याप गाठता आलेले नाही. अंतराळात आणि अवकाशात रहस्यमयी दुनिया असल्याचा दावा केला जात आहे. विशेत: समुद्राच्या तळाशी कधी कधी असे जीव सापडतात की रहस्यमयी दुनिया खरोखरचं अस्तित्वात असल्याचा विश्वास बसतो. समुद्राच्या तळाशी सापडलेल्या अशाच एका जीवाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. हा Alien तर नाही ना? असा प्रश्न व्हायरल झालेला भयानक फोटो पाहून सगळ्यांनाच पडला आहे.

हा जीव म्हणजे महाकाय असा शार्क मासा आहे. एका मच्छिमाराने 2100 फूट खोलीतून हा शार्क पकडला आहे. हा मासा दिसायला अत्यंत विचित्र आणि भयानक असा आहे.

ट्रॅपमन बर्मागुई नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबुक पेजवर या माशाचे फोटो शेअर केले आहेत. या माशाचे डोळे एकदम मोठे आहेत. काळ्या आणि निळ्या रंगामुळे त्याचे डोळे अत्यंत भितीदायक दिसत आहेत.

हॉलिवूड चित्रपटातील एका विलनच्या कॅरेक्टप्रमाणे हा मासा दिसत आहे. या शार्क माशाचे तीक्ष्ण पांढरे दात फोटोत दिसत आहेत. दातांप्रमाणेच या शार्कचे नाक देखील अतिशय टोकदार दिसत आहे. या माशाची त्वचा अत्यंत खडबडीत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर एका मच्छिमाराला हा शार्क मासा सापडला आहे. त्याने या माशाचे फोटो काढून फेसबुकवर शेअर केले आहेत.

या माशाचे फोटो पाहून अनेकांनी हा मासा नव्हे एलियन असल्याचा दावा करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी हा मासा शार्क माशाची एक प्रजाती असल्याचे म्हंटले आहे. हा मासा डॉग शार्क प्रजातीचा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.