6 हजारांची अंडरवेअर ! खरेदी करण्यासाठी उडाली झुंबड, असं खास आहे तरी काय ?

Pit Diaper: 'पिट डायपर' नावाची ही अंडरवेअर क्रुएल्टी-फ्री लेदरपासून तयार करण्यात आली आहे. लाँच झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच ही अंडरवेअर सोल्ड आऊट झाली होती. तब्बल 6 हजार रुपये देऊन खरेदी करण्यासारंख असं त्या अंडरवेअरमध्ये आहे तरी काय ?

6 हजारांची अंडरवेअर ! खरेदी करण्यासाठी उडाली झुंबड, असं खास आहे तरी काय ?
6 हजारांची अंडरवेअर खरेदी करण्यासाठी झुंबडImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 2:14 PM

सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी चर्चेत असतात. पण सध्या ज्या वस्तूची चर्चा सुरू आहेत, त्याचं नाव ऐकून तुम्ही डोक्यालाच हात लावाल. खरंतर सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या अंडरवेअरची चर्चा सुरू आहे. ऐकून हैराण झालात ना, पण हे खरं आहे. काळ्या रंगाची ही अंडरवेअर चेन आणि स्पाईक्सने सुसज्ज आहे. हे ऐकून तर तुम्ही नक्की विचार करत असाल की काटे असलेली ही अंडरवेअर अखेर घालेल तरी कोण ? पण त्याहून अधिक अजब गोष्ट म्हणजे ही अंडरवेअर खरेदी करण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. ही अंडरवेअर लाँच झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती सोल्ड आऊट ( Sold Out) झाली. म्हणजे तुम्हाला ही अंडरवेअर खरेदी करायची इच्छा असेल तर तुम्हाला आता आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. ही अंडरवेअर एका खास हेतूने तयार करण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

खरंतर, म्यूजिक कॉन्सर्टदरम्यान बाथरूम ब्रेकची चिंता दूर करण्यासाठी, ‘मेटल म्युझिक’ने आपल्या डाय हार्ड चाहत्यांसाठी ‘पिट डायपर’ नावाची एक अनोखा अंडरवेअर डिझाइन केली आहे, जी परिधान करून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय त्यांच्या आवडत्या गाण्यांचा आनंद घेऊ शकतील. याची किंमत 59 पाऊंड म्हणजे 6 हजार 336 रुपये इतकी आहे.

पिट डायपरचे वैशिष्ट्य

‘पिट डायपर’ ही क्रुएल्टी – फ्री लेदरपासून बनवलेली आहे, ती चेन आणि स्पाइकने सजवलेले आहे. ही अंडरवेअर फॅशन आणि फंक्शनचा यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला वासही येत नाही. तसेच यातून लीकेज होणार नाही याचीदेखील पूर्ण हमी देण्यात आली आहे. ही अंडरवेअर ‘लिक्विड डेथ’ आणि ‘डिपेंड’ नावाच्या कंपनीने एकत्रितपणे तयार केली आहे. ‘बाथरुम ब्रेकसाठी कोणताही शो थांबवता येणार नाही. पण पिट डायपर घातल्यावर मी कॉन्सर्टमधील कोणतेही गाणे मिस न करता स्वत:ला हायड्रेटेड ठेऊ शकतो’ असे पिट डायपरचे प्रमोशन करताना मेटलचे म्युझिक ड्रमर बेन कोलर म्हणाले.

कमाल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी

लिक्विड डेथ आणि डिपेंड यांचं हे कोलॅबरेशन अत्यंत कमाल असून त्याची मार्केटिंग स्ट्रॅटर्जीही वेगळीच आहे. यामध्ये ( अंडरवेअरद्वारे) फक्त समस्येचे सोल्यूशन दिलेलं नाही तर एक फॅशन ट्रेंड म्हणूनही ती समोर आली आहे. ही अंडरवेअर तुम्ही केवळ लिक्विड डेथच्या वेबसाईटवरूनच ऑर्डर करू शकता.

विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....