VIDEO | कुत्र्याला हल्ला, मालकाला बेदम मारला,भांडण पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
एक मोठा कुत्रा दुसऱ्या कुत्र्यावर हल्ला करतो. त्यानंतर मोठ्या कुत्र्याचा मालक मार खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला आपण जमिनीवर लोळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : जगात प्राणी प्रेमींची (Animal Lover) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकजण पाळीव प्राण्यासोबत दिसत आहेत. पाळीव प्राण्यांना संभाळनं म्हणजे लहानमुलांना संभाळण्या इतक सोप्पं नाही. ज्यांनी पाळीव प्राणी घरी संभाळले आहेत. त्यांना त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांच्या आरोग्याची (dog health) देखील काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर अनेकांना पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ आवडत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका पाळीव प्राण्याच्या चुकीमुळे मालक मार खात असल्याचे दिसत आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण पाळीव प्राणी रस्त्यात किंवा पार्कमध्ये पाहतो. त्याचवेळी एखादा दुसरा प्राणी दिसला तर तो प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत.
एक मोठा कुत्रा दुसऱ्या कुत्र्यावर हल्ला करतो. त्यानंतर मोठ्या कुत्र्याचा मालक मार खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला आपण जमिनीवर लोळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावेळी छोट्या कुत्र्याचा मालक दुसऱ्या कुत्र्याच्या मालकाला मारहाण करीत आहे. अनेकदा तोंडावर बुक्क्या मारल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
Dog owner being beaten after his dog attacked another dog pic.twitter.com/IAduZeYPGY
— Detect Fights ? (@detectfights) April 5, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक कमेंट आल्या आहेत. आतापर्यंत 4.7 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्या व्हिडीओ लगातार कमेंट येत आहेत. त्यामध्ये काही लोकं छोट्या कुत्र्याची चुकी असल्याचं म्हणत आहेत. काही लोकं म्हणतात, दोन्ही माणसं कुत्री संभाळायच्या लायकीची नाहीत. दोन्ही कुत्री काहीचं कामाची नसल्याची म्हणतं आहेत. काहीजण म्हणतात दोन्ही कुत्र्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.