Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : रानू मंडल से भी तेज, प्लंबर ते हॉलिवूड..! कसं बदललं बाथरूम सिंगरचं नशीब? वाचा सविस्तर

Kev Crane story : नशीब बदलायला वेळ लागत नाही असे म्हणतात. असाच प्रकार एका प्लंबरसोबत (Plumber) घडला. केव्ह क्रेन (Kev Crane) असे या प्लंबरचे नाव असून तो मूळचा यूकेच्या लीसेस्टरशायरचा (Leicestershire) आहे. त्याने संगीत निर्माता पॉल कोनेलीसोबत गाणे रेकॉर्ड केले.

Video : रानू मंडल से भी तेज, प्लंबर ते हॉलिवूड..! कसं बदललं बाथरूम सिंगरचं नशीब? वाचा सविस्तर
प्लंबर ते हॉलिवूड प्रवास करणारा केव क्रेनImage Credit source: BBC
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:39 PM

Kev Crane story : नशीब बदलायला वेळ लागत नाही असे म्हणतात. असाच काहीसा प्रकार एका प्लंबरसोबत (Plumber) घडला आहे. प्लंबर म्हणून काम करणारी ही व्यक्ती एका संगीत निर्मात्याच्या घरी कामाला गेली होती. घराच्या बाथरूममध्ये काम करत असताना प्लंबर गाणी म्हणत होता. संगीत निर्माता त्याच्या गाण्याने इतका प्रभावित झाला, की त्याने प्लंबरसोबत गाणे रेकॉर्ड करण्याची घोषणा केली. एका हॉलिवूड चित्रपट निर्मात्यानेही प्लंबरच्या या कथेवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. भारतीय गायिका रानू मंडल हिचे नशीबही एका रात्रीत बदलले होते. पूर्वी ती स्टेशनवर गायची. ‘द मिरर’च्या वृत्तानुसार, केव्ह क्रेन (Kev Crane) असे या प्लंबरचे नाव असून तो मूळचा यूकेच्या लीसेस्टरशायरचा (Leicestershire) आहे. साधे जीवन जगणारा 50 वर्षीय केव तेव्हा प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने संगीत निर्माता पॉल कोनेलीसोबत गाणे रेकॉर्ड केले.

‘व्हाय कान्ट आय बी यू?’

कॉनलीने पहिल्यांदा केव्हला बाथरूम दुरुस्त करताना गाताना ऐकले. प्लंबर ते गायक आणि नंतर हॉलिवूड चित्रपट, केव क्रेन हा प्रवास खूप रंजक आहे. प्लंबर म्हणून काम करत असताना केव गीतलेखनाचेही काम करत होता. दरम्यान, पॉल कॉनलीने त्याला गाताना ऐकल्यावर त्याच्यासोबत गायनाचा करार केला आणि काही दिवसांनंतर त्याचा पहिला अल्बम व्हाय कान्ट आय बी यू? रिलीज झाला. त्यांचे हे गाणे खूप प्रसिद्ध झाले, त्यानंतर कॉनलीने केवसोबत आणखी बरीच गाणी गायली. (Video courtesy – The Guardian)

कथा लवकरच मोठ्या पडद्यावर

म्युझिक अल्बम लाँच झाल्यानंतर केव क्रेनची कथा सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. त्यांची गाणी लोकांना खूप आवडतात. अलीकडेच लॉस एंजेलिस-आधारित चित्रपट निर्माता स्टेसी शर्मन आणि निर्माता बिली रे यांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी केवसोबत करार केला आहे, त्यानुसार त्याची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर (हॉलिवूड) दाखवण्यात येणार आहे.

‘माझी रात्रीची झोपच उडाली’

या प्रवासाबाबत केव सांगतो, की हे सर्व दुसऱ्यासोबत घडताना पाहण्यासारखे होते. माझ्यासोबत असे घडेल असे मला एका मिनिटासाठीही वाटले नव्हते. तो म्हणतो, की या संपूर्ण कथेचा विचार करताच मला रात्रीची झोप उडाली. आधी गाण्याच्या रेकॉर्डिंगचा करार आणि आता चित्रपट, हे खूपच रोमांचक आहे. केव अजूनही प्लंबर म्हणून काम करत आहे. वेळ मिळेल तेव्हा गाणी रेकॉर्ड करायलाही जातो.

आणखी वाचा :

म्हशीनं ‘या’ जनावरांना शिकवला चांगलाच धडा! कर्माचं फळ मिळालं थेट 5Gच्या स्पीडनं..! Video viral

Real Bahubali : कोणाला जमलं नाही ते यानं ‘करून दाखवलं’; लोक म्हणाले, हाच खरा ‘बाहुबली’, Video viral

Hyena video viral : एखादी मांजर असल्यासारखं तरसासोबत खेळतोय; लोक म्हणतायत, भीती कशी नाही वाटत?

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.