VIDEO | चोरट्याची हात चलाखी व्हिडीओत कैद, गर्दीचा फायदा घेत…
VIDEO VIRAL | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण बसमध्ये चढत असताना दुसरा तरुण त्याचं पॉकेट काढून घेत आहे. हा व्हिडीओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
मुंबई : ज्यावेळी बस (bus) थांब्यावर एखादी बस यायला उशिर झाला की, तिथं लोकांची गर्दी होते. त्याचवेळी अनेकदा प्रवासादरम्यान चोरटे प्रवाशांच्या वस्तू चोरतात. गर्दीत असलेले चोरटे संधीची वाट पाहतात आणि काही क्षणात लोकांच्या वस्तू चोरतात. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (video viral) व्हायरल झाला आहे. त्या चोरट्याने एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. लोकांनी हा व्हिडीओ (trending video) पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का देखील बसला आहे.
व्हिडीओ अधिक व्हायरल झाला
त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, लोकांची गर्दी समोरुन आलेल्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्याचवेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं पॉकेट काढून घेत आहे. ज्यावेळी त्या व्यक्तीचं गर्दीत पॉकेट काढून घेतलं आहे. त्या व्यक्तीला साधी कल्पना सुध्दा नाही. परंतु तो व्हिडीओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. चोरटे किती हुशार असतात हे त्यामध्ये पाहायला मिळालं आहे. लोकांनी हा व्हिडीओ अधिक व्हायरल केला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ १ लाख ५५ हजार लोकांनी लाईक केला
व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आला असेल, समोर असलेल्या एका व्यक्तीनं हा व्हिडीओ तयार केला आहे. त्या व्यक्तीला पहिलाचं संशय आल्यामुळे त्या व्यक्तीने हा सीन मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ १ लाख ५५ हजार लोकांनी लाईक केला आहे. काही नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत. एक व्यक्तीनं लिहीलं आहे की, समजा तो हा सगळा व्हिडीओत कैद करीत होता, त्याचवेळी त्याने त्या चोरट्याला ताब्यात घ्यायला हवं होतं.