Video | रांगड्या कवीचा ‘गावरान जांगडगुत्ता’, प्रेम आणि प्रेयसीची धम्माल कविता; एकदा पाहाच

नारायण पुरी त्यांच्या कविता या नेहमीच सोप्या, सहज असतात. प्रेमाचा जांगडगुत्ता ही तर त्यांची अजरामर अशी कविता आहे. (narayan puri premacha jangadgutta poem)

Video | रांगड्या कवीचा 'गावरान जांगडगुत्ता', प्रेम आणि प्रेयसीची धम्माल कविता; एकदा पाहाच
NARAYAN PURI
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 6:23 PM

मुंबई : जे न देखे रवी ते देखे कवी असं नेहमीच म्हटलं जातं. शब्दाच्या भांडवलाने अनेक कवींनी कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेले आहे. महाराष्ट्राला तर कवींचा मोठा वारसा लाभलेला आहे. ग्रामीण कवी, प्रेम कवी, हास्य कवी, शीघ्र कवी असे अनेक कवी आपल्या महाराष्ट्राच्या मातीत मराठी मनाची मशागत करत आहेत. सध्याच्या काळात कवी नारायण पुरी (Narayan Puri) यांचं नाव यामध्ये अग्रस्थानी घ्यावं लागेल. त्यांच्या कविता या नेहमीच सोप्या, सहज असतात. प्रेमाचा जांगडगुत्ता ही कविता तर त्यांची अजरामर अशी आहे. (poet Narayan Puri Premacha Jangadgutta viral poem video)

प्रेक्षकांना थेट भिडणारी कविता

नारायण पुरी यांनी आतापर्यंत अनेक कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या शब्दांमध्ये आहे. त्यांची ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ही कविता तर विशेष गाजलेली आहे. या कवितेत वापरण्यात आलेल्या उपमा, गावरान शब्द अगदीच मनाला भिडणारे आहेत. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीची इतर गोष्टींशी केलेली तुलना ऐकून आपल्याला गदगदून हासू येतं. पुरी यांच्या  प्रेमाचा जांगडगुत्ता या कवितेने कित्येक कवी संमेलनं जिंगलेली आहेत.

कवितेत नेमकं काय ?

नारायण पुरी यांची प्रेमाचा जांगडगुत्ता ही कविता तशी जुनी आहे. अमळनेर येथे 2020 साली हास्य कवी संमेलनामध्ये त्यांनी ही कविता पुन्हा एकदा सादर केली होती. यावेळीसुद्धा त्यांच्या या कवितेला मोठी दाद मिळाली होती. त्यांच्या या कवितेची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. या कवितेत एक प्रियकर आपल्या प्रेयसीचे गुणगाण गातोय. तिला विविध उपमा देऊन ती किती चांगली, सुंदर आणि गोड आहे हे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. कवितेत पुरी यांनी वापरलेल्या तुळसीवानी सत्वशील, आग्याबोंड, लाजाळू, कोमल, निवडुंगाचे झुडूप या उपमा लोकांना गदागदा हसवणाऱ्या आहेत. तसेच प्रियकराची हतबलता, त्याचं आपल्या प्रेयसीप्रति असलेलं समर्पण हेसुद्धा या कवितून हसत हसत समजून घेता येतं.

नारायण पुरी यांची प्रेमाचा जांगडगुत्ता कविता, पाहा व्हिडीओ :

नारायण पुरींच्या इतर कवितासुद्धा लोकप्रिय

नारायण पुरी यांची प्रेमाचा जांगडगुत्ता या कवितेमुळे  संपूर्ण महाराष्ट्रात ओळख झाली. त्यांच्या याच कवितमुळे त्यांना समस्त महाराष्ट्रात कवी म्हणून मान्यता मिळाली. मात्र, त्यांच्या इतरही कविता चांगल्याच लोकप्रिय आहेत. ‘काटा’ ही कविता तर प्रेमी युगुलांच्या थेट काळजाला भिडणारी आहे. त्याची ‘कविता म्हणजे काय ?’ ही कविता लोकांच्या अंगावर रोमांच उभं करणारी आहे. एका कवीमध्ये काय ताकद असू शकते आणि एक कविता काय क्रांती करु शकतो, ते पुरी यांच्या या कवितांमधून समजते.

इतर बातम्या :

Video | आधी बर्फावर रॅम्प वॉक, नंतर असं घडलं की मध्येच वाघाची शिट्टी गुल; पाहा व्हिडीओ

Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?

साडे 7 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी धोकादायक सापांमध्ये बसला, पुढे काय झालं? पाहा Viral Video

(poet Narayan Puri Premacha Jangadgutta viral poem video)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.