मुंबई : तुम्ही दारु पिऊन गाडी चालवत असाल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो ? तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडं आहे. वाहतून पोलिस (Traffic Police) तुमच्यावर कडक कारवाई करतील. त्यामध्ये तुमचा गाडी चालवण्याचा परवाणा (vehicle liecence) सुध्दा रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला जेल सुध्दा होण्याची शक्यता अधिक असते. परंतु आता पोलिसचं दाऊ पिऊन गाडी चालवा असं सांगत आहे. खरतर लोकांना दाऊ पिल्यानंतर किती धोका असतो हे समजण्यासाठी पोलिसांनी ही एक आयडिया काढली आहे. ही आयडीया अनेकांना आवडली आहे. त्याचबरोबर या प्रयोगाचं लोकांनी देखील कौतुक केलं आहे. हा सगळा प्रकार जपान (japan police news in marathi) देशात सुरु आहे.
सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, हा अनोखा प्रयोग दक्षिण-पश्चिम जापानच्या फुकुओकामधील चिकुशिनो या भागातील पोलिसांचा आहे. हे अभियान पोलिसांनी जपानमध्ये २००६ मध्ये सुरु केलं. एका मोठ्या दुर्घटनेनंतर हे अभियान तिथं सुरु करण्यात आलं आहे. दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने तीन मुलांचा जीव घेतला होता. सध्या ७७ वर्षाच्या एका व्यक्तीसह तिथल्या इतर दहा लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता.
हे अभियान फक्त लोकांना दारु पिल्यानंतर आणि दारु न पिल्यानंतर गाडी चालवताना किती धोका असतो हे समजण्यासाठी राबविण्यात येत आहे. दारु पिल्यानंतर गाडी चालवणं किती धोकादायक हे लोकांच्या लक्षात यावं हा मुख्य हेतु पोलिसांचा आहे.
तिथं चालकाचं स्किल, त्याचं अलर्टनेस आणि शांत या गोष्टींवर केलं जात. ज्या चालकांना या अभियानात सहभागी व्हायचं आहे. त्यांना एका मर्यादेच्या पलिकडे दारु पाजण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. ज्यावेळी चालकांची चाचणी सुरु होती, त्यावेळी त्यांच्यासोबत एक चांगला चालक सुध्दा ठेवण्यात आला होता.
यावेळी लोकांच्या लक्षात आलं की, जितका विचार केला होता, त्याच्यापेक्षा अधिक चुका होत आहेत. काही लोकांच्या हे सुध्दा लक्षात आलं की, ते त्यांची गाडी नियंत्रणात ठेऊ शकत नाहीत. पोलिस विभागाकडून हे सुध्दा सांगण्यात आलं आहे की, लोकांना विश्वास झाला आहे की, दारु पिऊन गाडी चालवणं अधिक डेंजर आहे.
जपान देशात दारु पिण्याचं प्रमाण तुलनेनं खूप कमी आहे. कोरोनाच्या काळात तिथल्या बार आणि मद्यविक्रीच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. जपानी लोकं वर्षाला सरासरी आठ लिटर दारु पितात.