Popcorn: मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न इतकं महाग का? पीव्हीआरचे अध्यक्ष अजय बिजली यांनी दिलं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 15, 2022 | 6:00 AM

मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआरचे (PVR) अध्यक्ष अजय बिजली यांनी आपलं मौन सोडलं आहे. पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न इतकं महाग का, असं कारण त्यांनी एका मुलाखतीत दिलं आहे. जाणून घ्या, टीकेदरम्यान त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं..

Popcorn: मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न इतकं महाग का? पीव्हीआरचे अध्यक्ष अजय बिजली यांनी दिलं स्पष्टीकरण
Pop Corn
Image Credit source: Social Media
Follow us on

महागडे पॉपकॉर्न (Expensive Popcorn) मल्टिप्लेक्समध्ये (Multiplex) नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. एक काळ असाही होता जेव्हा पॉपकॉर्न आणि इतर स्नॅक्स चित्रपटाच्या तिकिटांसह वाजवी किंमतीत उपलब्ध होते. गेल्या दशकात त्यांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. पॉपकॉर्नमध्ये सर्वाधिक दर वाढले आहेत. त्यावरही बराच काळ टीका होत आहे. या टीकेदरम्यान, मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआरचे (PVR) अध्यक्ष अजय बिजली यांनी आपलं मौन सोडलं आहे. पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न इतकं महाग का, असं कारण त्यांनी एका मुलाखतीत दिलं आहे. जाणून घ्या, टीकेदरम्यान त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं..

किंमतीत कोणतीही कपात होणार नाही- अध्यक्ष अजय बिजली

गेल्या काही काळापासून पीव्हीआरमधील पॉपकॉर्नच्या वाढत्या किमतींमुळे टीकेची झोड उठत आहे. याबाबत वृत्तपत्राशी बोलताना पीव्हीआरचे अध्यक्ष अजय बिजली यांनी स्पष्ट केले. “मला वाटतं की त्याच्या किंमती वाढत आहेत. मात्र, यासाठी ग्राहकाला दोष देता येणार नाही. पीव्हीआर मल्टिप्लेक्स चेनमधील फूड अँड ड्रिंक्सच्या किंमतीत कोणतीही कपात होणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तसेच त्यांच्यामध्ये किमतीही कमी होणार नाहीत. टीकेनंतरही तसे न करण्यामागे त्यांनी अनेक कारणे सांगितली.

ऑपरेशनल कॉस्ट वाढत आहे

अध्यक्ष अजय बिजली म्हणाले, ‘देशात बदल झाला आहे. सिंगल स्क्रीन अजूनही मल्टिप्लेक्समध्ये बदलत आहेत. या बदलामुळे खर्च म्हणजेच ऑपरेशनल कॉस्ट वाढत आहे. त्यामुळे तेथे खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत. हा असा काळ आहे जेव्हा एकाधिक स्क्रीन व्यवस्थापित करण्यासाठी, भाडे देण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारित करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. ते म्हणतात, “पूर्वी सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये प्रोजेक्शन आणि साऊंड सिस्टिम असायची. बहुतांश चित्रपटगृहे वातानुकूलित नव्हती, मात्र आता मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर चित्रपटगृहांमध्ये आता स्क्रीनच्या स्वरूपात अनेक प्रोजेक्शन रूम आणि साऊंड सिस्टीम असल्याने खर्चात ४ ते ६ पट वाढ झाली आहे. आता प्रत्येक मल्टिप्लेक्स पूर्णपणे वातानुकूलित झाले आहे. खर्च वाढत आहे.

लोकांच्या पसंतीमुळे व्यवसाय 1500 कोटींवर

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचा व्यवसाय 1500 कोटी रुपयांचा असल्याचे अध्यक्ष अजय बिजली सांगतात. मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थांचा दर्जा आवडला नसता आणि ते नाराज असते तर व्यवसाय या पातळीपर्यंत पोहोचला नसता. गेल्या महिन्यात पीव्हीआरने तिकीट दरातही वाढ केली आहे. “पीव्हीआर दरवर्षी तिकिटांच्या दरात 5-7 टक्क्यांनी वाढ करते. कोविडमुळे गेली अडीच वर्षे हे होऊ शकले नाही. त्यामुळे सध्या तिकिटांच्या दरात 23 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या किंमतीमुळे कंपनीला एक चतुर्थांश महसूल वाढण्यास मदत होत आहे.