सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो व्हायरल, लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित!

| Updated on: Apr 12, 2023 | 1:05 PM

आता हाच फोटो बघा ना, सध्या सोशल मीडियावर प्रभू रामाचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्याने सर्वांना चकित केले आहे.फोटो इतका क्यूट असेल तर खरा कसा असेल. मात्र, काही युजर्सचं असंही म्हणणं आहे की भगवान राम सावळ्या रंगाचे होते तर या फोटोत ते गोरे कसे दिसतायत?

सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो व्हायरल, लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित!
Prabhu Shriram photos
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) एक महान गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून एआयने लोकांना इतके वेड लावले आहे की विचारू नका. कारण, एआयपासून बनवलेले अप्रतिम फोटो लोकांना अक्षरशः वेड लावत आहेत. एआय आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी आपल्या समोर आणून ठेवतं. आता हाच फोटो बघा ना, सध्या सोशल मीडियावर प्रभू रामाचे एआयचे बनवलेले काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्याने सर्वांना चकित केले आहे.

प्रभू राम 21 वर्षांचे असताना ते कसे दिसत असतील याचा कधी विचार केला आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ते शक्यही झाले आहे. एआयपासून बनवलेला त्यांचा फोटो व्हायरल होत असून वाल्मिकी रामायण, रामचरितमानससह सर्व हिंदू ग्रंथांमध्ये दिलेल्या वर्णनानुसार तो तयार करण्यात आला आहे. एआयने भगवान रामाचे 21 व्या वर्षीचे हे चित्र तयार केले आहे. प्रभू रामाचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. एक नॉर्मल आहे. तर दुसऱ्या फोटोत तो हसताना दिसत आहे.

मात्र, एआयच्या मदतीने हे चित्र कोणी तयार केले, हे समजू शकलेले नाही. पण प्रभू रामाचे हे मनमोहक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोक म्हणतात की जेव्हा आर्टिफिशियल फोटो इतका क्यूट असेल तर खरा कसा असेल. मात्र, काही युजर्सचं असंही म्हणणं आहे की भगवान राम सावळ्या रंगाचे होते तर या फोटोत ते गोरे कसे दिसतायत?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एआय जनरेटेड फोटोंचा पूर आला आहे. ताजमहालच्या बांधकामाशी संबंधित काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात मजूर काम करताना दिसत आहात.