प्रसिद्ध ब्रँडेड टॉपचे अनोखे डिझाईन, किंमत पाहून व्हाल हैराण?
नुकतंच कंपनीने एक नवीन डिझाईनर टॉप तयार केला आहे. (Prada turtle neck jumper)
मुंबई : अनेकांना फॅशनेबल ब्रँड्चे कपडे किंवा वस्तू वापरण्याची फार सवय असते. पण काहीवेळा कपड्याच्या अनोख्या डिझाईनमुळे त्याची चेष्टा होते. नुकतंच एका प्रसिद्ध महागड्या प्राडा (Prada) या ब्रँडसोबत असेच काहीसे झाले आहे. प्राडा या प्रसिद्ध ब्रँडने डिझाईन केलेल्या एका कपड्यामुळे (Prada swiss cheese top) त्यांची सर्वत्र चेष्टा होत आहे. असा विचित्र पद्धतीचा टॉप पाहिल्यानंतर अनेकांना हा टॉप बनवण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न विचारला आहे. हा टॉप विचित्र असला तरी त्याची किंमत फार जास्त आहे. (Prada mocked for selling yellow turtleneck that looks like Swiss cheese)
प्राडा हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. या ब्रँडचे कपडे किंवा इतर वस्तू फार महाग आहेत. अनेक सेलिब्रेटी या ब्रँडचे कपडे वापरतात. मात्र नुकतंच कंपनीने एक नवीन डिझाईनर टॉप तयार केला आहे. हा टॉप पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.
प्राडा या कंपनीने डिझाईन केलेला टॉपला अनेक छिद्र आहेत.हा टॉप पाहिल्यानंतर टॉम अँड जेरी या कार्टूनमध्ये चीझप्रमाणे दिसत आहे. विशेष म्हणजे या टॉपला Openwork viscose turtleneck sweater असे नाव आहे.
Prada mocked as £905 yellow turtleneck with holes in ‘looks like Swiss cheese’ https://t.co/ur5U8CDaxi pic.twitter.com/fGzqimIBCK
— Daily Star (@dailystar) January 31, 2021
या टॉपची किंमत जवळपास 90 हजार रुपये इतकी आहे. हा टॉप प्राडाची वेबसाईटवर दिसत आहे. हा टॉप स्पिंग-समर/2021 कलेक्शनचा भाग आहे. (Prada mocked for selling yellow turtleneck that looks like Swiss cheese)
संबंधित बातम्या :
Budget 2021 Memes: मोदी सरकारच्या बजेटनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस