भारतात प्रीवेडिंगची क्रेझ गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलीय. आता तर प्रीवेडिंग (Pre Wedding Video) करणं म्हणजे एखाद्या शास्त्रासारखं असल्यासारखं लोक मानू लागलेत. प्रीवेडिंग करण्यासाठी वेगवेगळ्या भारी कल्पना लढवल्या जातात. अशातच आता प्रीवेडिंगचा एका अनोखा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना प्रीवेडिंगचा हा व्हिडीओ चक्का रोहित शेट्टीनेच (Rohit Shetty) तर दिग्दर्शित केला नाहीये ना, असा प्रश्न विचारला जातोय. एकापेक्षा एक विनोदी प्रतिक्रिया (Funny Video) लोकांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
नवरदेव आणि नवरीमुलीच्या वेशात दुचाकीवर बसून एक व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलाय.. दुचाकीवर बसण्यापर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर ही दुचाकी हवेत उडते. एका महिंद्रा स्कॉर्पिओला पार करते आणि सिनेस्टाईल पद्धतीने पुन्हा रस्त्यावर लॅन्ड होते.
pre-wedding shoots – i’m getting this pic.twitter.com/Ynwf7Kxr6a
— Best of the Best (@bestofallll) October 27, 2022
क्रेनच्या मदतीने स्टंटबाजी करत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या सगळ्या व्हिडीओची कल्पना पाहून लोकांना हा व्हिडीओ रोहित शेट्टीच्या सिनेमातील एखाद्या सिनप्रमाणेच वाटला आहे.
It’s not for Pre – wedding I think they will give this pic to Bollywood for there next movie Super man and Super woman ???
— Swati Singh ??❤ (@swatimehak10) October 27, 2022
इंटरनेट युजर्सनी हा व्हिडीओपाहून एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत. अनेकांना या व्हिडीओमुळे भारतात काहीही होऊ शकतं आणि भारतीय काहीही करु शकतात असं वाटलंय.
Pls send the final video
— constantine (@imfake_id) October 27, 2022
दरम्यान, काहींना प्रीवेडिंगच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणं जीवावर बेतू शकतं, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली. तर काहींनी या क्रिएटीव्हीचं कौतुकही केलं आहे.
हे नाही तर काही नाही, असं म्हणत काहींनी या प्रीवेडिंग व्हिडीओवर दिलखुलास दाद दिलीय. विशेष म्हणजे प्रीवेडिंगच्या मेकिंगचा हा एक व्हिडीओ पाहून काहींना फायनल आऊटपूट बघण्याचीही उत्सुकता लागलीय.
This or nothing ?
— मीनाक्षी ? (@qwerty_who_) October 27, 2022
बेस्ट ऑफ द बेस्ट या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. 77 हजारपेक्षा जास्त लोक हा व्हिडीओ पाहून झाले असून अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केलाय.