Video : भारतीय गाण्यावर न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर ठुमके, लाखो लाईक्स- करोडो व्ह्यूज, व्हीडिओ पाहून तुम्हीही फिदा व्हाल!
एक व्हीडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतोय. 'तेरे नाल नाचना' या लोकप्रिय गाण्यावर मुलगी डान्स करत आहे. तेही परदेशात... लोक न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरसमोर ही मुलगी डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात.बॉलीवूड गाण्यांवर परदेशात व्हीडिओ बनवले जात आहेत. असाच एक व्हीडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतोय. ‘तेरे नाल नचना’ या लोकप्रिय गाण्यावर मुलगी डान्स करत आहे. तेही परदेशात… लोक न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरसमोर ही मुलगी डान्स करताना पाहायला मिळत आहे. पूजा जैस्वाल (Puja Jaiswal) असं तिचं नाव आहे. तिचा हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या मुलीने तिच्या डान्समुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या टाईम्स स्क्वेअरसमोर या तरुणीने डान्स करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. तिचा हा डान्स अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतोय. ‘तेरे नाल नाचना’ या लोकप्रिय गाण्यावर मुलगी डान्स करत आहे. तेही परदेशात… लोक न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरसमोर ही मुलगी डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या मुलीने तिच्या डान्समुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या टाईम्स स्क्वेअरसमोर या तरुणीने डान्स करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. तिचा हा डान्स अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर हा व्हीडिओ अनेकांना आवडतोय. तसंच तिचा डान्स अनेकांना भुरळ घालतोय. आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 26 लाखांहून अधिक लोकांनी व्हीडिओला लाइक केलं आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हीडिओ आवडल्याचं अनेकांनी म्हटलंय.
View this post on Instagram
सध्या इन्स्टाग्रामवर असचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. एका मुलाने घागरा घालून आलियाच्या गंगुबाईमधल्या गाण्यावर डान्स केलाय. जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. ज्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. Jainil Mehta या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. “माझ्यासाठी हे नृत्यदिग्दर्शन नाही, तर रस्त्यावर नाचणे आणि लोकांशी संवाद साधणे हा आहे! माझ्यासाठी हे गाणे मी किती चांगले नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन करू शकतो याबद्दल नाही तर मी संगीताचे योग्य सार किती चांगले व्यक्त करू शकतो आणि आणू शकतो! याचा आहे” ,असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘झूम रे गोरी’ या लोकप्रिय गाण्यावर तो डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या