लेकीच्या जन्माचं जंगी स्वागत, हेलिकॉप्टरमधून नातीला आणलं घरी, जिद्दी आजोबांनी नादच केला!

अजित बालवडकर यांच्या सुनबाईने नुकतंच एका चिमुकल्या जीवाला जन्म दिला. त्यांच्या घरात मुलगी जन्माला आल्याने बालवडकर कुटुंब आनंदात आहे. त्याचमुळे त्यांनी चिमुकलीचं जंगी स्वागत केलं. नातीच्या जन्माने झालेला आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे आजोबांनी हेलिकॉप्टरनधून तिला घरी आणलं.

लेकीच्या जन्माचं जंगी स्वागत, हेलिकॉप्टरमधून नातीला आणलं घरी, जिद्दी आजोबांनी नादच केला!
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:06 PM

पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात राहणाऱ्या बालवडकर कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या पावलांची छोटी परी (Girl Birth) अवतरली आहे. तिच्या जन्माचं मोठ्या दिमाखात सेलिब्रेशन झालं. शेतकरी कुटुंबाने लेकीच्या स्वागताला थेट हेलिकॉप्टर (Helicopter) बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण या अश्या जंगी स्वागतामुळे परिसरात एकच चर्चा आहे. अजित बालवडकर यांच्या सुनबाईने नुकतंच एका चिमुकल्या जीवाला जन्म दिला. त्यांच्या घरात मुलगी जन्माला आल्याने बालवडकर कुटुंब आनंदात आहे. त्याचमुळे त्यांनी चिमुकलीचं जंगी स्वागत केलं. नातीच्या जन्माने झालेला आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे आजोबांनी हेलिकॉप्टरनधून तिला घरी आणलं. गावात पोहोचल्यावर त्या हेलिकॉप्टरने गावात तीन फेऱ्या मारल्या. याची सध्या परिसरात चर्चा आहे.

लेकीचं हेलिकॉप्टरमधून स्वागत

अजित बालवडकर यांच्या सुनबाईने नुकतंच एका चिमुकल्या जीवाला जन्म दिला. त्यांच्या घरात मुलगी जन्माला आल्याने बालवडकर कुटुंब आनंदात आहे. त्याचमुळे त्यांनी चिमुकलीचं जंगी स्वागत केलं. नातीच्या जन्माने झालेला आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे आजोबांनी हेलिकॉप्टरनधून तिला घरी आणलं. गावात पोहोचल्यावर त्या हेलिकॉप्टरने गावात तीन फेऱ्या मारल्या. याची सध्या परिसरात चर्चा आहे.

या मुलीचं नाव कृशिका ठेवण्यात आलं आहे. या बाळाची आई अक्षता आणि वडील कृष्णा बालवडकर खूप आनंदी होते. अक्षता यांनी आपलं मत मांडलंय. “मी आज खूप आनंदी आहे. आम्हाला एक मुलगा आहे. आता आम्हाला मुलगी व्हावी, अशीच इच्छा होती. अन् अखेर आमच्या घरी मुलीचाच जन्म झाला. माझे सासू सासरे देखील खूश आहेत. त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरमधून तिचं स्वागत केलंय.”

काही दिवसांआधी असंच पुण्यात चिमुकलीचं हेलिकॉप्टरमधून स्वागत करण्यात आलं. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. जन्मानंतर मुलीला चक्क हेलिकॉप्टर सफारी करत घरी आणण्यात आले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबीयांनी मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा आहे, असे समजून मुलीच्या जन्माचे जंगी आणि अनोखे स्वागत केले आहे. छोट्या परीला हेलिकॉप्टरमधून घरी आणत अनोख्या पद्धतीने मुलीचे स्वागत करत गावातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही दिला आहे. या ग्रॅण्ड वेलकमने गावकरीही आनंदात आहेत. कारण झरेकर कुटुंबाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय आम्ही घेतला, असे कुटुंबीयांनी आनंदाने म्हटले आहे. गावातही एक उत्साहाचे वातावरण यानिमित्ताने पाहायला मिळाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.