Viral video : फुग्यासोबत कुत्र्याचा अनोखा खेळ, यूझर्स म्हणतायत, लहानपणीची आठवण झाली!

Cute puppy video : एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. जो लोकांना खूप आवडतोय. तुम्ही कुत्र्यांना (Dog) खेळताना पाहिलं असेल. असाच एक कुत्रा त्याच्या फुग्याशी खूप आनंदाने खेळत आहे.

Viral video : फुग्यासोबत कुत्र्याचा अनोखा खेळ, यूझर्स म्हणतायत, लहानपणीची आठवण झाली!
फुग्याशी खेळणारा कुत्रा
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:25 AM

Cute puppy video : जगात बरेच प्राणी आहेत, परंतु त्यापैकी काही प्राणी आहेत, ज्यांना आपण आपले पाळीव प्राणी बनवू इच्छितो. या प्राण्यांच्या यादीत कुत्र्याचे नाव सर्वात वर आहे. कारण गोंडस असण्यासोबतच ते मालकाशी एकनिष्ठही असते आणि वेळ पडल्यावर जीव धोक्यात घालूनही ती मालकाचे रक्षण करते. सोशल मीडियावर कुत्र्याचे व्हिडिओ यूझर्सना चांगलेच आवडतात. विशेषत: लोकांना श्वानप्रेमींचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. जो लोकांना खूप आवडतोय. तुम्ही कुत्र्यांना (Dog) खेळताना पाहिलं असेल. त्यांच्यासोबत खेळायला खूप मजा येते. याचे कारण म्हणजे कुत्रे खूप चपळ असतात. दिवसभरही तुम्ही त्यांना इकडून तिकडे फिरवले तरी ते न थकता धावत राहतात. मात्र, जेव्हा त्यांना खेळायला मिळत नाही, तेव्हा ते स्वतःच खेळायला लागतात.

फुग्याशी खेळतो कुत्रा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा, जिथे कुत्रा फुग्याशी खेळण्यात मजा घेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा त्याच्या फुग्याशी खूप आनंदाने खेळत आहे. फुगा त्याच्यापासून पुन्हा पुन्हा उडून जातो आणि तो पुन्हा पुन्हा त्याला पकडतो आणि त्याच्याकडे आणतो. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 19 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 16 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने या कुत्र्याबद्दल लिहिले आहे, की याला हुशार म्हणतात, तर दुसर्‍या यूझरनेही कमेंट करत लिहिले आहे, की याला पाहून बालपण आठवले.

आणखी वाचा :

Video : Beautiful Look असलेला ‘हा’ पाहा जंगलातला अनोखा प्राणी, वेधून घेत आहे सर्वांचं लक्ष

Funny video viral : मुलगा चोर आहे, मग हाकलून का नाही देत? पिताश्री म्हणतात…

Viral : ‘हा’ प्राणी नेमका आहे तरी कसा? Photo पाहून विचाराच पडले यूझर्स

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.