VIDEO | एक्स्प्रेस ट्रेन गायीला धडकली आणि उलटी धावायला लागली, प्रवाशांमध्ये घबराट; लोकोपायलट निलंबित
पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेसचा (Purnagiri Jan Shatabdi Express) एक मोठा अपघात होता-होता टळला. पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस टनकपुर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी विरुद्ध दिशेने धावली.
देहरादून : उत्तराखंड (Uttarakhand) येथे काहीच दिवसांपूर्वी दिल्लीहून देहरादूनला येणाऱ्या जनशताब्दीला आग लागल्याची घटना समोर आली होती. ज्यानंतर बुधवारी दिल्लीहून टनकपूरला येणाऱ्या पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेसचा (Purnagiri Jan Shatabdi Express) एक मोठा अपघात होता-होता टळला. पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस टनकपुर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी विरुद्ध दिशेने धावली. त्यानंतर ट्रेनच्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला. तसेच, रेल्वे विभागातही खळबळ माजली (Purnagiri Jan Shatabdi Express Runs Backward In Uttarakhand).
रेल्वेने घाईघाईत अलर्ट जारी करत टनकपूर ते खटिमापर्यंतचे फाटक बंद केले. ट्रेन टनकपूर ते चकरपूरपर्यंत विरुद्ध दिशेत वेगाने अनेक किलोमीटरपर्यंत धावली. प्रवासी आणि ट्रेनला कुठल्याच प्रकारचे काही नुकसान पोहोचले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तर, या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली नॉर्दन रेल्वेने लोकोपायलट आणि गार्डला निलंबित केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी जवळपास चारवाजेच्या सुमारास होम सिग्नलजवळ एक गाय ट्रेनखाली आली. त्यानंतर ट्रेन थांबली आणि ट्रेनचं इंजिन आणि ब्रेकने काम करणे थांबवले आणि ट्रेन विरुद्ध दिशेने धावली.
पाहा व्हिडीओ –
#WATCH | Purnagiri Jansatabdi train runs backwards due to cattle run over b/w Khatima-Tanakpur section in Uttarakhand. Incident happened earlier today.
There was no derailment & passengers were transported to Tanakpur safely. Loco Pilot & Guard suspended: North Eastern Railway pic.twitter.com/808nBxgxsa
— ANI (@ANI) March 17, 2021
26 फेब्रुवारीला सुरु झाली पूर्णागिरी जन शताब्दी एक्स्प्रेस
बनबसामध्ये दगड लावून ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ट्रेन थांबली नाही. इज्जतनगर मंडळचे पीआरओ राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, घटनेच्या तपासासाठी तीन ए-ग्रेड ऑफिसर्सची टीम स्थापन करण्यात आली आहे. तपासात घटनेतील दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. गेल्या महिन्यात 26 फेब्रुवारीपासून पूर्णागिरी जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु झाली होती. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हर्च्युअल माध्यमातून टनकपूर स्टेशनवरुन या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
देहरादूनमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार, शताब्दी एक्स्प्रेसची बोगी जळून खाक#Delhi #ShatabdiExpress #DelhDehradunShatabdiExpresshttps://t.co/a5BDHnIli6
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2021
Purnagiri Jan Shatabdi Express Runs Backward In Uttarakhand
संबंधित बातम्या :
VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच !
प्रसववेदना सुरु झाल्या आणि क्रू मेंबर्स सरसावले, हजारो फूट उंचावर मुलीचा विमानातच जन्म