Video : छोटा पुष्पा!, “मै झुकुंगा नहीं साला…”, लहानग्याची निरागसता पाहून तुम्ही प्रेमात पडाल!

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला पुष्पा सिनेमातील 'पुष्पा... पुष्पराज पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फायर हू मै... झुकेगा नहीं साला', हा डायलॉग तो म्हणताना दिसत आहे.

Video : छोटा पुष्पा!, “मै झुकुंगा नहीं साला…”, लहानग्याची निरागसता पाहून तुम्ही प्रेमात पडाल!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 12:34 PM

मुंबई : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचं भारतीय सिनेरसिकांच्या मनावर गारुड आहे. दक्षिण भारतीय सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताहेत. बॉक्स ऑफिसवर गल्ला करण्याबरोबरच हे सिनेमे सिनेरसिकांच्या मनात घर करत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या नुकताच रिलीज झालेला आणि मोठ्या स्क्रीनवर दिमाखात मिरवणारा सिनेमा पुष्पा (Pushpa The Rise). पुष्पाने चाहत्यांच्या मनात घर करण्याचे जवळजवळ सगळे रेकॉर्ड मोडलेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण हा सिनेमा फक्त दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर देशभर या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमातील गाणी, त्यातले डायलॉग, सिनेमातील स्टेप्स, अगदी रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. अल्लूची (Allu Arjun) दाढीच्या खालून हात फिरविण्याची स्टाईल तर अफलातून आहे. लहानांपासून मोठ्यांना या स्टाईलने वेड लावलंय. एका चिमुरड्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात तो पुष्पाचे डायलॉग म्हणताना पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला पुष्पा सिनेमातील ‘पुष्पा… पुष्पराज पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फायर हू मै… झुकेगा नहीं साला’, हा डायलॉग तो म्हणताना दिसत आहे. हा व्हीडिओ द फ्रेंडशीप डेज् या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा चिमुकला इतक्या गोंडस पद्धतीने हा डायलॉग म्हणतोय की तो अनेकांना आवडला आहे. या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय. तर अनेकानी कमेंट करत आपल्याला हा व्हीडिओ आवडल्याचं म्हटलंय. तर काहींनी तिच्या निरागतेवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

असाच आणखी एका लहानग्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. हाच डायलॉग आणि त्याची स्टाईल करतानाचा एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या लहान मुलाचा हा क्यूट व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हितेश नायक या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हीडिओला 4 कोटी 36 लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करून हा व्हीडिओ आवडल्याचं सांगितलं आहे.क्यूट पुष्पा असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो, झुकना मत… तर तिसऱ्याने तू झुकणार नसशील तर मीही झुकणार नाही, असं म्हटलंय.

संबंधित बातम्या

Video : जंगलाच्या राजावर म्हशी भारी!, सिंहाला केलं ‘भीगी बिल्ली’, हे दोन व्हीडिओ पाहून म्हणाल, ‘म्हशीला मानलं पाहिजे!’

Video : लहानग्याचा घोड्यावर जडला,’ ते’ खास चुंबन सोशल मीडियावर व्हायरल

Video : बाप-लेकाने गायलं गाणं, व्हीडिओ व्हायरल, लोक म्हणतात “आवाज असावा तर असा…”

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....