Viral Video: चक्क उकळल्या तेलात हात घालून तो तळतोय भजे… व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क !

व्हायरल व्हिडिओ: कढईतील उकळत्या तेलात हाताने भजी तळतांना एक व्यक्ती सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत आहे. कढईत हात घालून, भजी काढणाऱया व्यक्तीचा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Viral Video: चक्क उकळल्या तेलात हात घालून तो तळतोय भजे... व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क !
Raipur PakodaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 11:10 PM

मुंबईः प्रत्येकाने त्याच्या कामात तज्ञ असणे आवश्यक आहे. तसे, सामान्यतः असे दिसून येते की कोणतीही व्यक्ती कोणतेही काम सुरू करते, मग त्याचे मन त्यात गुंतलेले असो वा नसो. आपण करीत असलेल्या कामात आपल्याला रस नसला तर, तर ती व्यक्ती आपले काम नीट करू शकणार नाही हे उघड आहे. याऊलट आपल्याला त्या कामाची आवड असेल तर ती व्यक्ती आपल्या कामात इतकी परिपूर्ण होते की लोक त्याला पाहून आश्चर्यचकित (Surprised) होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (viral on social media)होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कामात इतका परफेक्ट झाला आहे की तो हाताने गरम तेलातील भजे काढतो. रायपूर येथील बसस्थानकावर एक व्यक्ती उकळत्या तेलात हात (Hands in boiling oil) घालून, भजी तळतांना दिसत आहे. त्याच्या या भजी विकण्याच्या अनोखा पराक्रम पाहून, त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे.

उकळत्या तेलाला हात लावण्याची लोकांची हिंमत नसताना, ती व्यक्ती थंड पाण्यावर तरंगणारी वस्तू बाहेर काढल्याप्रमाणे उकळत्या तेलातील भजी बाहेर काढत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कढईत उकळत्या गरम तेलात भजे तळले जात आहेत आणि एक व्यक्ती त्यात हात घालून 5-6 भजे आरामात बाहेर काढते आणि एका पेपरमध्ये गुंडाळून ग्राहकांना देते. यात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे हे करताना हात जळणार की काय अशी भीती दुकानदाराला वाटत नाही. हात जळू नयेत म्हणून उकळत्या तेलातून भजे बाहेर कसे काढायचे हे त्या दुकानदाराला माहीत झाले आहे. या कामात तो खूप तरबेज झाल्याचे त्याचे म्हणणे आहे.

साडेआठ लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ

हा धक्कादायक व्हिडीओ छत्तीसगडमधील रायपूर येथील बस स्टँडचा आहे, जिथे पकोडे विकणाऱ्याचा हा अनोखा पराक्रम पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हरीश गोस्वामी यांच्या नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 8 लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 61 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे आणि त्यावर विविध प्रकारच्या मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी याला रायपूरचा प्रसिद्ध दाल पकोडा म्हटले आहे, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीतरी आश्चर्यचकित झाले आहे की दुकानदार हे कसे करतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.