अजगरासोबत खेळणे महिलेच्या अंगलट आले; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

अजगर हा तसा शांत प्राणी मानला जातो. त्याच्या वाटेला कुणी गेलं नाही तर तो सहसा कुणावर हल्ला करत नाही. मात्र अजगराला जर कोणी निष्कारण त्रास दिला तर तो शांत राहत नाही.

अजगरासोबत खेळणे महिलेच्या अंगलट आले; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
अजगरासोबत खेळणे महिलेच्या अंगलट आलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 5:08 PM

सोशल मीडियावरील बरेच व्हिडिओ आपणाला थक्क करून सोडतात. काही व्हिडिओ आपलाही थरकाप उडवतात. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ आहे महिला आणि अजगरचा. महिला अजगराशी मस्करी (kidding) करू लागली, त्याच्याबरोबर खेळू लागली. मात्र काही क्षणांतच अजगरने आपले खरे रूप दाखवले आणि महिलेला आपण केलेला कृत्याचा मोठा पश्चाताप झाला. अजगराने महिलेवर हल्ला (Paython Attack on Woman) केला आणि तिला जणू मृत्यूच्या दाढेतच खेचले. या प्रसंगाचा व्हिडिओ सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच थरारक अनुभव झालं.

अजगर तितकाच शांत, तितकाच आक्रमक

संपूर्ण जगभरात सापाच्या हजारो प्रजाती आहेत. बरेच साप विषारी असतात तर बिनविषारी सापांच्या प्रजातीही कित्येक आहेत. किंग कोब्रा, अजगर यांसारखे साप मनुष्य जीवितला मोठा धोका निर्माण करतात.

अजगर हा तसा शांत प्राणी मानला जातो. त्याच्या वाटेला कुणी गेलं नाही तर तो सहसा कुणावर हल्ला करत नाही. मात्र अजगराला जर कोणी निष्कारण त्रास दिला तर तो शांत राहत नाही. म्हणूनच अजगर हा तितकाच शांत, तितकाच आक्रमक प्राणी मानला जातो.

हे सुद्धा वाचा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील महिला ही तिच्या घरातील पाळीव अजगरासोबत खेळत असते. अचानक ती अजगराला संताप येईल अशा प्रकारे त्रास देते, त्यामुळे अजगराचा पारा चढतो आणि तो महिलेला धडा शिकवतो.

एका काचेत ठेवले होते अजगराला

पाळीव अजगराला घरामध्ये एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेले असते. महिला काचेच्या बॉक्सचे झाकण बाजूला सारतो, त्यावेळी आतील अजगर उग्र रूप घेऊन बाहेर पडतो. अजगराने थेट महिलेच्या हातावर दंश केला.

नंतर काही क्षणांत तिच्या हाताला संपूर्णपणे वेटोळे घातले. नंतर अजगराचा विळखा सोडवताना तिच्या पतीच्या चांगलेच नाकीनाऊ आले. दोघेही अजगरच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी प्रचंड धडपड करू लागले.

यादरम्यान महिलेच्या हाताला जखम झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अजगर किती भयानक प्राणी आहे याची प्रचिती आपल्याला नक्कीच येत आहे. रेक्स चापमॅन नावाच्या ट्विटर हँडलवरून याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

व्हिडिओमधील थरारक प्रसंग अनुभवण्यासाठी सोशल मीडियातील वाढता प्रतिसाद पाहून लक्षात येत आहे. अनेक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स नोंदवल्या आहेत तर तितक्याच प्रमाणात लाइक्सही मिळाल्या आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिला तर इतरांना थरारक प्रसंग दाखवून देण्यासाठी नक्की शेअर करा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.