Viral : ‘हाच तर स्वर्ग आहे!’ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना काश्मीरनं घातलीय भुरळ, Share केले Photos
काश्मीर(Kashmir)ला पृथ्वीवरील स्वर्ग (Heaven) म्हणतात. हिवाळ्या(Winter)च्या मोसमात इथं प्रचंड बर्फवृष्टी (Snowfall) होते. रेल्वे मंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनाही श्रीनगरच्या सौंदर्यानं भुरळ घातलीय. काही छायाचित्रे त्यांनी ट्विटरवर शेअर केलीत.
भारतात एकापेक्षा एक सुंदर ठिकाणं आहेत, जी पाहिल्यानंतर लोक आपल्याला एक अभिमानाची भावना येते. विशेषतः जर आपण काश्मीर(Kashmir)बद्दल बोललो तर त्याला पृथ्वीवरील स्वर्ग (Heaven) म्हणतात. हिवाळ्या(Winter)च्या मोसमात इथं प्रचंड बर्फवृष्टी (Snowfall) होते आणि त्यानंतर आजूबाजूला जे दृश्य दिसतं ते खरच स्वर्गापेक्षा कमी नसतं. या ठिकाणच्या सौंदर्यानं सर्वांनाच भुरळ घातलीय. यामुळेच लाखो लोक इथं फिरण्यासाठी येतात आणि पृथ्वीवरील स्वर्गासारखं दृश्य अनुभवतात. परदेशातूनही मोठ्या संख्येनं लोक इथं येतात आणि सौंदर्यानं मंत्रमुग्ध होतात. जगभरातल्या सुंदर ठिकाणांची छायाचित्रं सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असली तरी आजकाल श्रीनगरमधल्या काही छायाचित्रांनी लोकांचं मन मोहून टाकलंय.
रेल्वे मंत्र्यांना घातली भुरळ
रेल्वे मंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनाही श्रीनगरच्या सौंदर्यानं भुरळ घातलीय. संपूर्ण बर्फानं झाकलेल्या श्रीनगर रेल्वे स्थानकाची काही छायाचित्रे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलीत. आजूबाजूला फक्त शुभ्रता दिसते.
अमीर खुसरोंच्या ओळी
फोटो शेअर करताना, रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सुफी गायक अमीर खुसरो यांच्या प्रसिद्ध ओळीही लिहिल्या आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त… हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’. याचा अर्थ पृथ्वीवर स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे.
तीन Photos शेअर
रेल्वेमंत्र्यांनी 3 छायाचित्रं शेअर केलीत, ज्यात पहिल्या फोटोत श्रीनगर रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या झाडांवर बर्फाची चादर दिसतेय. तर दुसरा फोटो रेल्वे ट्रॅकचा आहे, जो पूर्णपणे बर्फानं झाकला आहे आणि तिसऱ्या फोटोत, रेल्वे स्थानकाच्या बाहेरचं एक सुंदर दृश्य आहे.
“गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त” #SrinagarRailwayStation pic.twitter.com/aP7zkWxCyQ
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 9, 2022
‘हा आमचा स्वर्ग’
श्रीनगर रेल्वे स्थानकाची सुंदर छायाचित्रं पाहून सोशल मीडिया यूझर्सनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं ‘पृथ्वीचा स्वर्ग आमचं काश्मीर आहे’ असं लिहिलंय. तर अनेक यूझर्सनी अमीर खुसरोच्या त्या ओळींचा अर्थ सांगितलाय.