Bengali Song Kacha Badam Reel : एक बंगाली गाणं सध्या प्रचंड वेगानं व्हायरल होतंय. ते म्हणजे कच्चा बदाम (Kacha Badam). ज्यांना बंगाली (Bengali) भाषा समजत नाही, त्यांच्यामध्येही हे गाणं आवडीनं गुणगुणलं जातंय. तरुणाईला तर या गाण्याचं वेड लागलंय. हे गाणं व्हायरल झाल्यापासून त्याच्या रील्स(Reels)चा पाऊस पडत असल्याचं दिसून येतंय. कुणी गाणं गाताना दिसतंय, तर कुणी नाचताना… एकापेक्षा एक अशा स्टेप्स या गाण्यावर आपल्याला पाहायला मिळतील. कधी बाप मुलाची जोडी तर कधी बाप-लेकीची. गाण्यासह आता रील्सनंही यूझर्सना वेड लावलंय, असंच म्हणावं लागेल. आता आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. यात तरुणींनी कच्चा बदामवर कसं नृत्य केलंय, ते तुम्हाला दिसून येईल.
इन्स्टाग्रामवर रील्सचा पाऊस
इन्स्टाग्रामवर तरुणी या गाण्यवर थिरकतानाचे व्हिडिओ अपलोड होत आहेत. इन्स्टावर शॉर्ट व्हिडिओ म्हणजेच रील्सच्या माध्यमातून त्या आपल्या आवडीवर नियंत्रण न ठेवता बिनधास्तपणे रील्स बनवून जास्तीतजास्त लाइक्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या अकाऊंटवरच्या काही रील्स एकत्र करून मग त्यादेखील अपलोड केल्या जात आहेत. आम्ही हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अॅलेक्सा रील्स (Alexa Reels) या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला विविध इन्स्टाग्रामच्या या गाण्यावरच्या रील्स एकत्र पाहायला, ऐकायला मिळतील.
यूझर्सकडून पसंती
Alexa Reels याच यूट्यूब चॅनेलवर या गाण्यांसंबंधीचे इतर अनेक व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळतील. आता जो व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, तो 24 जानेवारीला अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत त्याला 122,839+ व्ह्यूज मिळालेत आणि सातत्यानं यात वाढच होत आहे. इन्स्टाग्रामवर तुम्ही रील्स पाहिल्या असतीलच. आता त्यातल्या काही एकत्र करून एकाच ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता… (Video Courtesy – Alexa Reels)