VIDEO | तीन मामांकडून नववधूला लग्नात 3 कोटींची भेट, बॅगेतले पैसे काढताना सगळे पाहत राहिले, नंतर पैशांनी भरलेलं ताट पाहून…
सोशल माीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात, राजस्थानमधील एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तीन मामांनी आपल्या भाचीला गिफ्ट दिल्यानंतर...
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Viral Video) झाला आहे. तो व्हिडीओ एका लग्नातील आहे. त्या व्हिडीओमध्ये एक विशेष आहे, तीन मामांनी भाचीला असं काही गिफ्ट दिलं आहे की, लग्नाच्या मंडपातील सगळी मंडळी त्याकडे पाहत राहिली. हा सगळा प्रकार राजस्थानमधील जयपूर येथील असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. राजस्थान (Rajsthan) हे राज्य मुलीला माहेरच्यांकडून काय गिफ्ट मिळणार या गोष्टीसाठी अधिक प्रसिध्द आहे. हा व्हिडीओ नागौर जिल्ह्यातील असल्याचं चर्चा सुध्दा सोशल मीडियावर आहे. ज्यावेळी मुलीचे तीन मामा एका बॅगेतून मंडपात कॅश घेऊन पोहोचले, त्यावेळी तिथली परिस्थिती पाहण्यासारखी झाली होती. लग्नाला आलेले सगळे पै-पाहुणे त्या पैशांच्या ताटाकडे एकसारखे पाहत राहिले.
तीन मामांनी आपल्या भाचीच्या लग्नात 3 करोड़ 21 लाख रुपयांचं गिफ्ट दिलं. यावर ते थांबले नाहीत, तर मामांनी शेती, सोने, चांदी, ट्रॅक्टर अशा अनेक वस्तू गिफ्ट दिल्याची चर्चा आहे. व्हायरल व्हिडीओ नागौर जिल्ह्यातील झाडेली गावातील आहे. भंवरलाल पोटलिया आणि घेवरी देवी यांची मुलगी अनुष्का हीचं लग्न मागच्या दोन दिवसांपुर्वी एकदम धुमधडाक्यात झालं. मेश्वर, राजेंद्र आणि हरेंद्र अशी अनुष्काच्या मामांची नावं आहेत. तीन मामांची मागच्या दोन दिवसांपासून सगळीकडं चर्चा सुरु आहे.
नवरीला गिफ्टमध्ये काय-काय मिळालं
आपल्या घरच्याकडून इतकं मोठं गिफ्ट मिळाल्याने घेवरी देवी यांच्या डोळ्यात पाणी आलं. घेवरी देवी यांच्या वडिलांनी सांगितलं की, अनुष्का कुटुंबातील एकमेव मुलगी आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाला हे सगळं मिळालं आहे. अनुष्काच्या माहेरकडून 81 लाख रुपयांची रोकड, 16 मोठी शेतं, 30 लाखांची जमीन, 3 किलो चांदी, 41 तोळं सोनं, एक ट्रैक्टर, धान्याने भरलेली एक ट्रॉली, एक स्कूटी, त्याचबरोबर गावातील प्रत्येक घरात एक चांदीचा शिक्का देण्यात आला.
फिर मायरा दहेज से अलग कैसे हुआ ? बस देने का तरीका ही अलग दिख रहा है.#Nagaur pic.twitter.com/gzVhmA9onG
— अवधेश पारीक (@Zinda_Avdhesh) March 16, 2023
माहेरच्यांनी सगळे रेकॉर्ड तोडले
झाडेली गावातील माहेरच्यांनी आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. या लग्नाची सगळीकडं चर्चा आहे. त्याचबरोबर या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.