असा श्वानप्रेमी तुम्ही पाहिलाय? कुत्र्याच्या मृत्यूनंतर केलेल्या एका कृत्तीनं सर्वच थक्क, पाहून तुम्हीही म्हणाल….
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये एका कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकाने हिंदू रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले. तसेच तेराव्या दिवसाच्या समारंभात १००० लोकांना जेवण देण्यात आले. तर हा तरुण म्हणतो की, त्याच्यासाठी त्याचा कुत्रा हा केवळ प्राणी नव्हता, तर कुटुंबातील एक सदस्य होता.
![असा श्वानप्रेमी तुम्ही पाहिलाय? कुत्र्याच्या मृत्यूनंतर केलेल्या एका कृत्तीनं सर्वच थक्क, पाहून तुम्हीही म्हणाल.... असा श्वानप्रेमी तुम्ही पाहिलाय? कुत्र्याच्या मृत्यूनंतर केलेल्या एका कृत्तीनं सर्वच थक्क, पाहून तुम्हीही म्हणाल....](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/dog-2.jpg?w=1280)
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सारंगपूरमधील सुलतानपूर गावात पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर मालकाने जे काही ते पाहून तेथील संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी आजारी पडल्यावर तरुणाने त्याच्या कुत्र्याला उपचारासाठी भोपाळला नेले आणि उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. दरम्यान कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्या तरुणाने ज्या काही पद्धतीने त्याचे अंत्यसंस्कार केले ते पाहून संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली आहे.
आपण जेव्हा एखाद्या माणसाचे निधन झाल्यावर हिंदी रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करतो व तेराव्या दिवसापर्यंतची सर्व प्रक्रिया करतो. अगदी तसेच या कुत्र्याच्या मृत्यूनंतर देखील या तरुणाने कुत्र्याचे अंत्यसंस्कार करत त्याचे तेरावे उत्तरकार्य केले आहे. नेमकं या तरुणाने त्याच्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर काय केले ते जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपूर येथील गावात जीवन नागर या तरुणाचा पाळीव कुत्रा आजारी पडल्याने त्यांनी प्रथम त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथे प्रकृती सुधारली नाही, तेव्हा त्या कुत्र्याला पुढील चांगल्या उपचारासाठी कारने भोपाळला नेले आणि तेथे प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांनी त्याला दफनविधीसाठी गावी आणले आणि उज्जैनमधील शिप्राच्या काठावर दशकर्म केले. त्यांनी सोमवारी तेरावा उत्तरकार्य देखील आयोजित केला, ज्यात सुमारे 1000 लोकांना जेवण देण्यात आले.
जीवन नागरने या तरुणाने जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याला थंडीमुळे १० जानेवारी रोजी आजारी पडला आणि प्लेटलेट्समध्ये घट झाली. जीवन नागर यांनी सांगितले की, त्यांचा पाळीव कुत्रा काही दिवसांपासून आजारी होता. स्थानिक उपचाराने कुत्र्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी त्याला पुढील उपचारासाठी भोपाळला नेले आणि तेथील पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. मात्र, कुत्र्याची प्रकृती खालावत गेली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान कुत्र्याला गावी आणून त्याला दफन केले
कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्या तरुणाने त्याला गावी आणले आणि पूर्ण सन्मानाने दफन केले. तसेच कुत्र्याविषयी असलेले प्रेम व श्रद्धेमुळे त्यांनी उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर धार्मिक विधींचे पालन करून दशकर्म केले. दशकर्माबरोबरच हिंदू परंपरेनुसार त्यांनी मुंडनही केले.
या तरुणाने सोमवारी त्याच्या पाळीव कुत्र्यासाठी तेरावा म्हणजेच उत्तरकार्य दिवस आयोजित केला होता, या कार्याला गाव आणि परिसरातील सुमारे १००० लोक उपस्थित होते. या उत्तरकार्यात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांनी तरुणाच्या या कृतीचे कौतुक केले आणि पाळीव प्राण्यांप्रती प्रेम आणि जबाबदारीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले. यावेळी गावकऱ्यांसह अनेकांनी रोमी या कुत्र्याला श्रद्धांजली वाहिली.
सुलतानियन गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. काहींनी ही अतिशयोक्ती मानली आहे, तर काहींनी तरुणाच्या प्रेमाला आदर्श म्हटले आहे. कुत्र्याच्या मृत्यूनंतर झालेल्या कार्यक्रमानेही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या तरुणाचे म्हणणे आहे की, त्याच्यासाठी त्याचा कुत्रा हा केवळ प्राणी नव्हता, तर कुटुंबातील सदस्य होता.