‘त्या’ शिवसैनिक आजींची नातही म्हणते ‘झुकेगा नहीं साला!’, चिमुकलीच्या अदांवर दुनिया फिदा, पाहा व्हायरल आजीची ‘कल्लाकार’ नात

शिवसैनिक आजी आणि त्यांची पुष्पा स्टाईल अनेकांना भावली. त्यांनी पुष्पा स्टाईलने राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाला. आता या आजीच्या नातीचे फोटो व्हायरल होत आहेत. यात तीही पुष्पा स्टाईल करताना पाहायला मिळाली.

'त्या' शिवसैनिक आजींची नातही म्हणते 'झुकेगा नहीं साला!', चिमुकलीच्या अदांवर दुनिया फिदा, पाहा व्हायरल आजीची 'कल्लाकार' नात
व्हायरल आजीची व्हायरल नात
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 4:16 PM

मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकारण मातोश्री आणि राणा दाम्पत्य आणि हनुमान चालिसा याच्या भोवती फिरताना दिससत आहे. अश्यातच या सगळ्या प्रकरणात एक आजींची चर्चा झाली. या शिवसैनिक आजी आणि त्यांची पुष्पा स्टाईल अनेकांना भावली. त्यांनी पुष्पा स्टाईलने राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाला. आता या आजीच्या नातीचे फोटो व्हायरल होत आहेत. यात तीही पुष्पा स्टाईल करताना पाहायला मिळाली. तिचे फोटो अनेकांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

व्हायरल आजीची कल्लाकार नात

शिवसैनिक आजी आणि त्यांची पुष्पा स्टाईल अनेकांना भावली. त्यांनी पुष्पा स्टाईलने राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाला. आता या आजीच्या नातीचे फोटो व्हायरल होत आहेत. यात तीही पुष्पा स्टाईल करताना पाहायला मिळाली. तिचे फोटो अनेकांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

फेसबुकवर फोटो व्हायरल

“सध्या मशीदिवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्रात राजकारण जोरदार सुरूय. अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री बाहेर हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याची घोषणा केली आणि शिवसैनिक आक्रमक झाले. दोन दिवस जागता पहारा देणारे अनेक शिवसैनिक त्यापैकी एक 80 वर्षीय आजी. पुष्पा स्टाईलने आजीने दिलेलं आवाहन. आजींची ठाकरे कुटुंबाने फोनवरून केलेली विचारपूस… आणि आजींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबाने घेतलेली भेट हे चर्चेचे मुद्दे… आज आजींच्या परळ येथील राहत्या घरी मुलाखतीला गेलो. मुलाखत तर झालीच आजींचा संपूर्ण प्रवास कळला. पण एक नवीन चित्र पाहायला मिळालं ते म्हणजे आजींच्या नातवाची मुलगी आण्वि शिंदे… छोटी आहे पण आजीने पुष्पां स्टाईल कशी केली याची हुबेहूब नक्कल करून दाखवतेय… काल मुख्यमंत्री घरी आले तेव्हा देखील या छोटीने मुख्यमंत्र्यांना देखील सेम स्टाईल करून दाखवली असं तिच्या घरच्यांनी आवर्जून सांगितलं…”, अशी पोस्ट एका नेटकऱ्याने लिहिली आहे.

दोन दिवसाआधी राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानावर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार होते. यावेळी तिथे शिवसैनिक जमले होते. यात एक आजीबाई आक्रमकपणे बोलातना पाहायला मिळाल्या. जणू त्या मातोश्रीची रक्षा करण्यासाठी आल्या आहेत, असं त्यांच्या वागण्यातून जाणवत होतं. या आजींची सध्या सध्या जोरदार चर्चा आहे. या आजीबाईंनी शिवसेनेच्या वतीने पुष्पा स्टाईलमध्ये राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिलं. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे. त्यांना आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये बोलावून घेतलं. आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर या आजींनी बाहेर येताच पुष्पा स्टाईलने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. पुष्पाची मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग म्हणत त्यांनी शिवसैनिक माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.