Ratan Tata यांचा ‘तो’ कुत्रा, मिटिंगमध्येही असतो सोबत, मनोरंजक कथा Viral; वाचा सविस्तर

Interesting story of Ratan Tata's dog : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे जसे धनानं मोठे तसंच मनानंही मोठे असल्याचं आपण जाणतो. आता करिश्मा मेहता (Karishma Mehta) या महिलेनं रतन टाटांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. Linkedinवर त्यांनी पोस्ट केली आहे.

Ratan Tata यांचा 'तो' कुत्रा, मिटिंगमध्येही असतो सोबत, मनोरंजक कथा Viral; वाचा सविस्तर
आपल्या लाडक्या कुत्र्यांसह रतन टाटा
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 4:18 PM

Interesting story of Ratan Tata’s dog : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे जसे धनानं मोठे तसंच मनानंही मोठे असल्याचं आपण जाणतो. त्यासंबंधीच्या कथाही आपण अधूनमधून सोशल मीडियावर पाहत, ऐकत असतो. अशीच एक बाब समोर आलीय. करिश्मा मेहता (Karishma Mehta) या महिलेनं रतन टाटांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यांना म्हटलंय, की एकदा त्या टाटांची मुलाखत (Interview) घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान खुर्चीच्या बाजूला एक कुत्रा त्यांच्या नजरेस पडला. ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि संस्मरणीय मुलाखत ठरल्याचं मेहता यांनी म्हटलंय. करिश्मा मेहता या ह्यूमन्स ऑफ बॉम्बेच्या फाऊंडर आणि सीईओ आहेत. लिंक्डइन(Linkedin)वर त्यांनी ही मुलाखतीची कहाणी शेअर केलीय. टाटांटी मुलाखत घेण्यासाठी मी आतूर होते. खूप दिवसांपासून त्यांच्या मुलाखतीची वाट पाहत होते, असं त्यांनी म्हटलंय. यावेळी मला थोडी भीतीही वाटत होती, अशा भावनाही व्यक्त केल्या.

‘टाटांनी कुत्र्याला समजावलं’

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की मुलाखतीदरम्यान मी रतन टाटा यांचे सहायक शांतनू यांना म्हटलं, की मला खूप भीती वाटतेय. बहुतेक माझं म्हणणं रतन टाटांनी ऐकलं असावं. त्यांनी मला विचारलं, की काय झालं? आपण ठीक आहात ना? मग आपल्याला कुत्र्याची भीती वाटत असल्याची माहिती शांतनू यांनी टाटांना दिली. यावर टाटांनी आपली खुर्ची कुत्र्याकडे वळवली आणि म्हटलं, की गोवा (कुत्र्याचं नाव) ही तुला घाबरत आहे. तेव्हा एका चांगल्या मुलासारखं व्यवस्थित बसून राहा.

View this post on Instagram

A post shared by Ratan Tata (@ratantata)

‘असं माझ्यासोबत कधीही झालं नाही’

यानंतर रतन टाटांनी मुलाखत पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं. ही मुलाखत जवळपास 30 ते 40 मिनिटं चालली. यादरम्यान तो कुत्रा जवळपासही फिरकला नाही. मला आश्चर्य वाटलं, कारण असं माझ्यासोबत कधीही झालं नाही. करिश्मा म्हणाल्या, की रतन टाटा यांनी गोवा म्हणजेच त्या कुत्र्याला मांडीवर बसवलं होतं. तो दिवसभर त्यांच्यासोबतच असतो. एवढंच नाही, तर हा कुत्रा टाटांसोबत मिटिंगमध्येही जातो. हा आगळावेगळ किस्सा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

आणखी वाचा :

Viral : कोट्यवधी रुपयांच्या बुगाडीवर अब्जावधीची सर्जनशीलता भारी! अफलातून Creativityचा ‘हा’ Video पाहाच

Incredible India : ‘इथे’ एक कप चहा पिणंदेखील स्वर्गसुख, Anand Mahindra यांनी शेअर केला अप्रतिम Photo

Video Virao : तीन मजले चढतो फक्त 15 सेकंदांत! यूझर्स म्हणतायत, ही तर Spidermanला टक्कर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.