Ratan Tata यांचा असाही विक्रम, आनंद महिंद्र यांना याबाबतीत मागे टाकले

रतन टाटा यांना तरुण पिढीकडून सर्वाधिक पसंत केले जात असल्याचा आणखी एक पुरावा मिळाला आहे. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा हा पुरावा निदर्शक ठरला आहे.

Ratan Tata यांचा असाही विक्रम, आनंद महिंद्र यांना याबाबतीत मागे टाकले
RATAN TATA - ANAND MAHINDRAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 6:33 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : रतन टाटा ( Ratan Tata ) उद्योग क्षेत्रातील एक निर्गवी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याबद्दल सामान्य जनतेला अपार आदर आहे. त्यांच्या दातृत्व आणि प्राणीप्रेम सर्वश्रृत आहे. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत केली आहे आणि करीत आले आहेत. एक उद्योगपती असतानाच ते सोशल मिडीयात देखील सक्रीय असतात. त्यांच्या नावे एक नवा विक्रम जोडला गेला आहे. आता रतन टाटा यांनी महिंद्र एण्ड महिंद्र ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्र यांना देखील एका बाबतीत मागे टाकले आहे. चला पाहूयात रतन टाटा यांनी आता काय नवा विक्रम केला आहे.

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 ( Hurun India Rich List 2023 ) ने दिलेल्या माहितीनूसार रतन टाटा यांनी सोशल मिडीयावर फॉलोअर्सच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. इंडीयन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उद्योगपती रतन टाटा यांचे एक्सवर ( आधीचे ट्वीटर ) सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. या पूर्वी हा रेकॉर्ड आनंद महिंद्र यांच्याकडे होता.

12.6 दशलक्ष फॉलोअर्स

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 च्या मते सोशल मिडीयावर लोक रतन टाटा यांना सर्वाधिक फॉलो करतात. त्यांच्या फॉलोअर्सची यादी वाढतच चालली आहे. रतन टाटा यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढून 12.6 दशलक्ष ( एक कोटी 26 लाख ) झाली आहे.

एक वर्षांत वाढले 8 लाख फॉलोअर्स

उद्योगपती रतन टाटा यांच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या एक वर्षांच्या काळात सर्वात जास्त वाढली आहे. वर्षभराच्या आतच रतन टाटा यांच्या फॉलोअर्सची संख्या आठ लाखांनी वाढली. या वाढीमुळेच त्यांनी याबाबती सोशल मिडीयात सर्वात सक्रीय असलेल्या उद्योगपती आनंद महिंद्र यांना मागे टाकले आहे.

आनंद महिंद दुसऱ्या क्रमांकावर

महिंद्र एण्ड महिंद्र कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्र यांचाही फॅन फॉलोईंग एक्सवर तगडा आहे. ते आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. आनंद महिंद्र यांच्या फॉलोअर्सची संख्या एक्स ( ट्वीटर ) वर 10.8 दशलक्ष इतकी आहे. 360 वन वैल्थ हुरुन इंडिया लिस्टच्या मते आनंद महिंद्र सोशल मिडीयावर फॉलोअर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आनंद महिंद्र यांना एक कोटीहून अधिक लोक फॉलो करतात.

मोटीव्हेशन पोस्टला पसंत केले जाते

आनंद महिंद्र यांच्या प्रेरणादायी पोस्टला खूप जण पसंत करतात. तसेच समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टीवरही ते आपल्या पोस्टमधून आपली परखड मते बिनधास्त व्यक्त करीत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.