Remembrance of Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्या आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली. सोशल मीडियावर लोक त्यांना आपापल्या शैलीत आदरांजली वाहत आहेत. तर आणखी एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. कीर्तना(Kirtan)त त्यांचा उल्लेख करण्यात आलाय. कीर्तनकार ह. भ. प. सुनिताताई आंधळे यांनी आपल्या कीर्तनामध्ये त्यांची आठवण काढलीय. हा व्हिडिओ लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या, त्यावेळचा आहे. कीर्तनात त्यांच्या चांगल्या आरोग्याविषयी प्रार्थना केली जातेय. आता सोशल मीडिया(Social Media)वर हा कीर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा यावेळी उल्लेख करण्यात आलाय. लता मंगेशकरांचा रत्न म्हणून उल्लेख करण्यात आलाय.
‘अनेकांच्या काळजात केलं घर’
कीर्तनात सुनिताताई म्हणतात, की लता मंगेशकर देशाचं रत्न आहेत. ते रत्न गेल्यानंतर देशाची शान जाते. स्पर्धक उरला नाही तर जगण्यामध्येही काही स्वारस्य राहत नाही. लता मंगेशकरांचं गाणं ऐकलं की वेड्यालाही समाधी लागते. अनेक अभंग, देशभक्तीपर गीतं त्यांनी गायली. ती अनेकांच्या काळजात घर करून आहेत, असा उल्लेख त्यांनी कीर्तनात केला. वझर आघाव याठिकाणी हे कीर्तन झाल्याचं व्हिडिओत दिसतंय.
यूट्यूबवर अपलोड
मराठी तडका या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 6 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखांहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पाहणाऱ्यांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. यूझर्स या व्हिडिओला लाइक आणि कमेंट्सही करत आहेत. ‘कीर्तनात लता मंगेशकर यांची आठवण!’ असं कॅप्शन देण्यात आलंय.
मल्टीऑर्गन निकामी झाल्याने निधन
रविवारी लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्या 92व्या वर्षांच्या होत्या. मल्टीऑर्गन निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. (Video Courtesy – MARATHI TADKA)
आणखी वाचा :