Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनाचा पहिला सोहळा ते प्रमुख पाहुणे, तुम्हाला या रंजक गोष्टी माहिती आहेत का?
दरवर्षी आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण 26 जानेवारीला काय घडलं हे अनेकांना माहित नसेल. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा करतो. तर या दिवशी या रंजक गोष्टी जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
![Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनाचा पहिला सोहळा ते प्रमुख पाहुणे, तुम्हाला या रंजक गोष्टी माहिती आहेत का? Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनाचा पहिला सोहळा ते प्रमुख पाहुणे, तुम्हाला या रंजक गोष्टी माहिती आहेत का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Republic-Day-2025.jpg?w=1280)
भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी संपूर्ण भारतभर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 26 जानेवारी 1949 ला भारताने संविधान स्वीकारले, पण 26 जानेवारी 1950 पासून ते लागू करण्यात आले. यादिवशी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीसह भारताला संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केलं होतं. हा दिवस भारतीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस असून त्याच्याशी निगडित अनेक रंजक किस्से आहेत. तसेच येथे काही किस्से सांगणार आहोत जे तुम्हाला माहित नसतील. चला जाणून घेऊयात.
1. राज्यघटनेची निर्मिती : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली, पण त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. संविधान तयार करताना निर्मितीत डॉ. भीमराव आंबेडकर यांचा यात मोलाचा वाटा होता.
2. प्रजासत्ताक दिनाचा पहिला सोहळा : प्रजासत्ताक दिनाचा पहिला सोहळा २६ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्लीतील आयर्विन स्टेडियम आताचे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे पार पडला. या समारंभाला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते.
3. प्रमुख पाहुणे : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोणत्याही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा शासक यांना प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आमंत्रित केले जाते. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर प्रमुख पाहुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते.
4. प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्या व्यक्तीला सन्मान दिला जातो. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश असतो.
5. प्रजासत्ताक दिनाची परेड : प्रजासत्ताक दिनाची परेड नवी दिल्लीतील राजपथावर आयोजित केली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे जवान सहभागी होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी दरवर्षी जुलैमध्ये सुरू होते. पहाटे तीन वाजता पॅराडिस्ट कार्यक्रमस्थळी पोहोचतात. यामध्ये हे लोक जवळपास 7 महिने तयारी करतात.
6. सलामी देणे : परेडमध्ये आलेल्या प्रमुख लोकांना हवेत गोळीबार करून सलामी दिली जाते. राष्ट्रगीताच्या वेळी हा हवेत गोळीबार केला जातो. त्याचबरोबर १९४१ मध्ये तयार केलेल्या शस्त्रातून दरवर्षी गोळीबार करून सलामी दिली जाते . या मनोरंजक किस्से वाचून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.