Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subarnarekha River : भारताची सुवर्णरेखा! या नदीत आहे सोन्याचा खजिना

Subarnarekha River : सोन्याच्या खाणी असतात आणि सोने तिथून काढण्यात येते, असे आपल्याला माहिती आहे. पण देशात अशी पण एक नदी, जिच्या वाळूतून सोने निघते.

Subarnarekha River : भारताची सुवर्णरेखा! या नदीत आहे सोन्याचा खजिना
ही तर सोन्याची खाण
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 12:08 PM

नवी दिल्ली : भारतात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. निसर्गाचे अनेक चमत्कार आहे. या वैविध्यपूर्ण देशात आणखी एक आश्चर्य आहे. सोन्याच्या खाणी (Gold Mines) असतात आणि सोने तिथून काढण्यात येते, असे आपल्याला माहिती आहे. पण देशात अशी पण एक नदी, जिच्या वाळूतून सोने निघते. आता तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. कारण आता काही भागात मॅपिंगच्या मदतीने नवीन सोन्याच्या खाणी गवसल्या आहेत. तिथे एखाद्या नदीतून सोने (Golden River) निघत असेल, यावर अनेकांना विश्वास बसत नाही. पण ही गोष्ट खरी आहे. या राज्यातील ही नदी भारताची सुवर्णरेखा (Subarnarekha) म्हणून ओळखली जाते. या नदीतील वाळूतून सोने निघते. गेल्या कित्येक वर्षांपासून या नदीतून सोने काढण्यात येत आहे. त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेकांना त्यातून फायदा होतो.

भारताची सुवर्णरेखा तर ही नदी झारखंड (Jharkhand) राज्यातील रत्नगर्भामध्ये आहे. या नदीचे नाव सुबर्ण रेखा (Subarnarekha River) असे आहे. या नदीतून सोने काढण्यात येते. ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशा (Odisha) या राज्यातून वाहते. ज्या पट्यात या नदीतून सोने निघते, त्या पट्याला सुवर्णरेखा असे म्हटले जाते. या भागात सोन्याचे कण, छोटे गोळे मिळतात.

474 किलोमीटर लांब नदी सुवर्ण रेखा नदी दक्षिण-पश्चिम वाहते. ही नदी नगडी गावाजवळ उगम पावते. त्या ठिकाणाला रानीचुआं असे नाव आहे. पुढे वाहत जाऊन ही नदी बंगालच्या खाडीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीची एकूण लांबी 474 किलोमीटर आहे. या नदीला अनेकांची, या भागातील आदिवासींची सुवर्णललाट रेखा म्हणतात.

हे सुद्धा वाचा

सोनेरी कणांचे रहस्य सुवर्णरेखा आणि तिची सहायक नदी करकरी सोन्याची खाण आहे. या नदीतून सोन्याचे कण वाहतात. ते वाळूमध्ये अडकतात. करकरी नदी 37 किलोमीटर लांब आहे. पण या दोन्ही नदीत हे सोनेरी कण येतात कोठून हा कुतूहलाचा विषय आहे. त्याबाबत संशोधन पण सुरु आहे. पण अजून ठोस असा पुरावा मिळालेला नाही.

स्थानिक आदिवासी काढतात सोने झारखंड (Jharkhand) मधील या नदीतील वाळून आजूबाजूचे लोक उपसतात. ती वाळू चाळण्यात येते. त्यातून सोन्याचे कण एकत्रित करण्यात येतात. एक व्यक्ती एका महिन्यात 70 ते 80 सोन्याचे कण गोळा करते. या सोन्याच्या कणाचा आकार तांदळा इतका असतो. पावसाळा वगळता इतर महिन्यात या भागातील आदिवासी हाच व्यवसाय करतात. त्यातून त्यांना कमाई होते.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.