Video: क्रिकेट खेळताना तुम्ही मित्रासाठी तुम्ही कधी नियमात बदल केला आहे का ? पाहा व्हायरल व्हिडीओ
अपंग मित्रासाठी नियम बदलला, मित्राने घेतली क्रिकेटची मजा
मुंबई: मुळात क्रिकेट (Cricket) हा खेळ भारतात प्रत्येकाच्या आवडीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण भारतात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा होतात. आयपीएलमुळे (IPL)अनेक खेळाडूंना संधी मिळाली, तसेच त्यांच्याकडील चांगल्या खेळीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर खेळायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी मित्रासाठी क्रिकेटचे नियमात बदल केला आहे.
व्हिडीओमध्ये क्रिकेट खेळताना काही मुलं दिसत आहेत, त्यामध्ये एक दिव्यांग मुलगा आहे. त्याला इतर मुलांसारखं पळता येत नाही. परंतु तो क्रिकेट खेळत आहे. मित्रांनी त्याच्यासाठी क्रिकेटचे नियम बदलल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लोकं क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांचं कौतुक करीत आहेत.
इससे बड़ा मोटिवेशन आपको पूरे इंटरनेट पर नहीं मिलेगा। pic.twitter.com/wr6gwpkvh0
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) December 27, 2022
ज्यावेळी फिल्डींग करणाऱ्या तरुणाच्या हातात बॉल जातो. त्यावेळी रणआऊट करण्याची संधी असताना सुद्धा अपंग खेळाडूला बाद करत नाहीत. त्याला खेळण्याची संधी देतात, यावरुन त्या तरुणांची समजदारी लक्षात येते असं एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेक लोक त्यावर कमेंट करीत आहे. त्याचबरोबर अनेकांना तो व्हिडीओ आवडला आहे. मुळात त्या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात एक चांगला मेसेज जात असल्याचं अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.