Baba Vanga Prediction : सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र…; बाबा वेंगांनी केली होती भविष्यवाणी

| Updated on: Feb 28, 2022 | 2:24 PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे (Bulgaria) अंध गूढवादी बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अचूक भाकीत केले होते.

Baba Vanga Prediction : सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र...; बाबा वेंगांनी केली होती भविष्यवाणी
बाबा वेंगा/संग्रहित छायाचित्र
Follow us on

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमध्ये नासधूस केली असून मोठे नुकसान केले आहे. युक्रेनची राजधानी कीवसह देशातील अनेक शहरांतील इमारतींसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हुकूमशाही वृत्ती जग पाहत आहे. आता रशिया पुन्हा एकदा जगाचा राजा होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे (Bulgaria) अंध गूढवादी बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अचूक भाकीत करणाऱ्या बाबा वांगे यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक दिवस जगावर राज्य करतील असे म्हटले होते. असे मानले जाते की त्यांचे स्वतःचे अंदाज 85 टक्के खरे ठरले.

‘बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस’

बाबा वेंगा यांना ‘बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणूनही ओळखले जाते. वाएन्गा यांनी लेखक व्हॅलेंटिन सिदोरोव्हला सांगितले की रशिया “जगाचा स्वामी” बनेल, तर युरोप “ओसाड जमीन” बनेल. बाबा वायेन्गा यांनी पुतीन यांच्या संभाव्य संदर्भामध्ये भाकीत केले आणि सांगितले, की सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र एकच गोष्ट राहील ती म्हणजे व्लादिमीरचे वैभव, रशियाचे वैभव… ते पुढे म्हणाले, की रशियाला कोणीही रोखू शकत नाही.

बाबा वेंगा कोण? जाणून घ्या

बाबा वेंगा यांचा जन्म 1911मध्ये झाला. त्यांनी दावा केला, की वयाच्या 12व्या वर्षी एका मोठ्या वादळात त्यांची दृष्टी गूढपणे गेली. त्यानंतर त्यांना भविष्याकडे पाहण्यासाठी देवाकडून एक अत्यंत दुर्मीळ भेट देण्यात आली. 1996मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू, झाला तेव्हा त्यांनी 5079पर्यंत चालणारी भविष्यवाणी केली होती. या वर्षी जगाचा अंत होईल, असे भाकीत त्यांनी केले होते. सोव्हिएत युनियनचे विघटन, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि 2004मध्ये थायलंडची त्सुनामी, चेरनोबिल आपत्ती आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेबद्दलचे त्यांचे दावे खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांचे 1996मध्ये वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले.

बाबा वेंगा यांनीही 2022ची केली होती भविष्यवाणी

बाबा वेंगा यांनी भारताबाबत भाकीत केले होते, की येथील तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होईल. त्यामुळे पिकांवर परिणाम होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. 2022मध्ये जगातील मोठ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे परिणाम दिसून येतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर नद्यांच्या प्रदूषणामुळे वाहणारे पाणी कमी होईल. 2022मध्ये लोक पूर्वीपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवतील, म्हणजेच लोक संगणक आणि मोबाइलवर जास्त वेळ घालवतील.

 

आणखी वाचा :

…अन् भर मांडवातच वधू-वराची Fighting, वराला कशामुळे आला राग? पाहा Viral video

…जेव्हा शेळीला राग येतो..! पाहा शेळी आणि मोर यांच्यात झाली लढाई, Video viral

मगरही सपशेल फेल! तोंडात पकडलेली शिकार सहज बाहेर पडून निघून जाते, पाहा Viral video