गव्याला पाहायला लोकांची गर्दी, सुरक्षित जंगलात जाण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहा

छोटा बोगद्या पार करून गवा पुढे सरकला होता. गूगल मॅपवर पाहिले असता पुढे एक मातीचा बांध होता, तिथपर्यंत गवा जाईल व त्यातून तो सुखरूप बाहेर येईल असं नियोजन फोन वरून करण्यात आले.

गव्याला पाहायला लोकांची गर्दी, सुरक्षित जंगलात जाण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहा
गवा....Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 2:08 PM

शिराळा : दोन दिवसापुर्वी रिळे (RILE) येथील ग्रामस्थांना सकाळी आठच्या दरम्यान खंडोबा मंदिराच्या (KHANDOBA) परिसरात गव्याचे दर्शन झाले. सदर गव्याला माणसांची चाहूल लागताच त्याने फुफेरे फाटा नजीक असणाऱ्या शेत शिवाराकडील कालव्याकडे धाव घेतली. रिळे येथील वारणा डावा कालव्यात सदर गवा खाली उतरला. हा मुख्य कालवा असल्याने, त्यातून गवा बाहेर पडू शकतं नव्हता. दिवसा गवा दिसत आल्याची बातमी (SANGLI, SHIRALA)परिसरात पसरल्याने रिळेसह परिसरातील अनेक नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी व कालव्यातून बाहेर पडण्यासाठी गर्दी केली.

लोकांच्या गर्दीला व आवाजाला घाबरून हा गवा कालव्यामधून पुढे सरकत रिळे गावा नजिक असलेल्या डाव्या कालव्याच्या जलसेतू (aqueduct)मधून पुढे शिराळे खुर्द-फुपरे गावच्या हद्दीवरील पावले वस्तीनजीक पोहोचला होता. सदरची माहिती नागरिकांनी वन विभागाला कळवली होती. त्यामुळे वन रक्षक हणमंत पाटील व प्रकाश पाटील हे वन मजुरा सोबत घटनास्थळी पोहोचले व गव्यापासून लोकांना दूर ठेवले. कालव्यातून बाहेर पडण्यासाठी गवा प्रयत्न करत होता. सदरची माहिती आरएफओ बगले साहेबांनी मला अवगत करून दिली असता, जागेवर असलेली वन कर्मचऱ्यांकडून लाईव्ह लोकेशन घेतले व जागेचा आढावा घेतला.

छोटा बोगद्या पार करून गवा पुढे सरकला होता. गूगल मॅपवर पाहिले असता पुढे एक मातीचा बांध होता, तिथपर्यंत गवा जाईल व त्यातून तो सुखरूप बाहेर येईल असं नियोजन फोन वरून करण्यात आले. कालव्यात झाडोरा नसलेनी सावली अजिबात नव्हती. त्यामुळे गवा पूर्ण दमला होता. मातीचा बांध पार करून बाहेर जात असताना लोकांना पाहून तो परत कालव्यात उतरला. लोकांना दूर करत गावाच्या विरूद्ध बाजूला असलेल्या काठाने गवा वर चडून येईल असे नियोजन केले व जागा निर्मनुष्य केली गेली. गवा काही वेळातच कालव्यातून बाहेर आला व जंगलाचे निरिक्षण करत सुखरूप निघून गेला.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनेत, गव्याला हुसकत असताना हल्ले झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. अश्या घटनेची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यात होवू नये, म्हणून योग्य ती खबरदारी घेत सदर गव्याला न दमवता किंवा न भीती दाखवता त्याच्या मर्जीने कालव्यातून सुखरूप बाहेर काढण्यात, वन विभाातर्फे बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. एन .पाटील, हनुमंत पाटील आदींसह अमर पाटील, तानाजी यांनी जागेवर नियोजनपूर्वक काम केलं. तसेच ह्या घटनेत योग्य सूचना व मार्गदर्शन हे डीसीएफ निता कट्टे मॅडम, एसीएफ अजित साजने साहेब व आएओ बगले साहेब यांनी केलं. ग्रामस्थ व सर्व सांगली वन विभागाचे अभिनंदन, हा सगळा कंटेट व्हायरल झाला असून प्रणव महाजन यांनी लिहिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.