Viral video : Body detox करण्यासाठी प्यायलं जाणारं चीनमधलं ‘हे’ सूप भारतात कुणी ट्राय करेल?
Weired food : उन्हाळ्यानंतर चीनमध्ये या पदार्थाची मागणी वाढते. विशेष म्हणजे ही डिश बनवण्यासाठी विषारी साप (Snake) आणि विंचू (Scorpion) वापरतात, हे जाणून घेतल्यानंतर तुमचा गोंधळ उडेल. Radii Chinaच्या वेबसाइटनुसार, ही विचित्र डिश चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात बनवली जाते.
Weired food : तुम्ही अनेक विचित्र पदार्थांबद्दल ऐकले असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका अजब पदार्थाबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला कदाचित तो किळसवाणा प्रकार वाटेल. उन्हाळ्यानंतर चीनमध्ये या पदार्थाची मागणी वाढते. विशेष म्हणजे ही डिश बनवण्यासाठी विषारी साप (Snake) आणि विंचू (Scorpion) वापरतात, हे जाणून घेतल्यानंतर तुमचा गोंधळ उडेल. Radii Chinaच्या वेबसाइटनुसार, ही विचित्र डिश चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात बनवली आणि विकली जाते. ताटात साप आणि विंचू हे दोन अत्यंत विषारी प्राणी ठेवले आहेत. साप आणि विंचू यांचे मिश्रण करून बनवलेले हे सूप दक्षिण चीनमध्ये आढळते. त्यात डुकराचे मांसदेखील टाकले जाते. याशिवाय त्यात खास मसाले टाकले जातात. या सर्व प्रक्रियेनंतर हा पदार्थ टेस्टी होतो, असे येथील अनेकांचे म्हणणे आहे.
सगळीकडे मिळत नाही!
चीनमधील लोकांचा असा विश्वास आहे की हे खास सूप प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की हे सूप येथील पाककृती आणि संस्कृतीचा भाग आहे, परंतु ते येथील प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही. ही डिश काही खास ठिकाणी मिळते, जी खूप अनुभवी स्वयंपाकी बनवतात. विंचू बनवण्याआधी त्याचे आतून विष कसे काढायचे हे या स्वयंपाक्यांना माहीत असते.
…आणि विंचूही खातात
हा पदार्थ बनवण्यापूर्वी साप आणि विंचूचे विष काढले जाते. यासाठी साप आणि विंचू सुमारे 3 तास शिजवले जातात. यानंतर डुकराचे मांस आणि साप असलेल्या भांड्यात आले, लसूण आणि विशेष मसाले टाकतात. त्यात काही भाज्याही टाकल्या जातात. यानंतर त्यात विंचूचा रस मिसळला जातो. चीनच्या लोकांना त्याची चव खूप छान वाटते. काही लोक हा विंचूही खातात.