Sea water animal video : प्रत्येकाला समुद्र आवडतो. जेव्हा लोक समुद्रकिनारी जातात तेव्हा ते पोहण्यापासून सर्व इतर प्रकारची मजा करतात. हे करत असताना अनेकवेळा काही लोक अपघाताला बळी पडल्याचेही दिसून आले आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल, की समुद्रात राइड, बोटिंग करताना बोटीजवळ काही धोकादायक मगरीसारखा सागरी प्राणी आला. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच घाबरून जाल. व्हिडिओत जे दिसत आहे ते पाहून समुद्रात राइड करणारे लोक आरडाओरड करतात. काही लोक समुद्रात फिरायला गेले होते. यादरम्यान ते बोटीतून राइडचा (Ride) आनंद घेण्यासाठी समुद्राच्या (Sea) मध्यभागी ते पोहोचले. लोक तीन-चार बोटींवर (Boating) बसून राइड एन्जॉय करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान एक मोठा भितीदायक समुद्री प्राणी त्यांच्या बोटीजवळ येतो.
कोणावरही करू शकत होता हल्ला
या भितीदायक प्राण्यांना पाहून ते ओरडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धोकादायक प्राणी पाहून तेथील लोक घाबरतात. बोटीखालून सागरी प्राणी बाहेर पडतो. बोटीखाली जाऊन तो प्राणी पाण्यातून बाहेर आला असता, तर बोट उलटली असती आणि पोहणारे लोक पाण्यात बुडाले असते. याशिवाय तो प्राणी त्या लोकांवर हल्ला करून इजाही करू शकत होता.
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर
सुदैवाने, तो समुद्री प्राणी कोणालाही इजा करत नाही आणि थोड्या वेळाने निघून जातो. मात्र, तो जेवढा जास्त काळ तेथे राहतो तेवढा राइड करणाऱ्यांचा जीव अडकला होता. कारण असे दृश्य कोणाला पाहायला मिळाले तर तोही घाबरून जाईल. oceanlife.4u नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
आणखी वाचा :