फेसबुकवरून सेकंड हँड कपाट घेतलं, दरवाजा उघडताच महिलेचे डोळे चमकले; असं घडेल याची अपेक्षाच नव्हती?
एक महिलेने फेसबुक मार्केटप्लेसवरून जुने कपाट खरेदी केले. कपाटात हर्मेस आणि टिफनीसारख्या लक्झरी ब्रँडची प्लेट्स आणि बॉक्स आढळले. ही प्लेट्स आणि बॉक्स लाखो रुपयांची असल्याचे समजले. या आश्चर्यकारक शोधामुळे महिला आनंदी झाली. अनेकांना सेकंडहँड खरेदीत असे अनपेक्षित आश्चर्य मिळाल्याचे अनुभव आले आहेत.
अनेकदा आपण गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाइनचा आधार घेतो. दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा घर बसल्या ऑर्डर देऊन वस्तू किंवा खाद्यपदार्थ मागवण्यावर आपला भर असतो. अशावेळी ऑनलाइन मागवलेल्या वस्तू चांगल्याच निघतील असं नसतं. कधी कधी त्या खराबही निघतात. त्यामुळे मग आपल्याला पुन्हा कटकटीचा सामना करावा लागतो. तक्रार करा आणि परत वस्तू बदलून घ्या यात बराच वेळ जातो. शिवाय मनस्तापही होतो. एका महिलेनेही फेसबुकवरच्या मार्केटप्लेस नावाच्या ग्रुपवरून कपाट खरेदी केलं. सेकंड हँड कपाट होतं. पसंत पडलं म्हणून तिने खरेदी केलं. कपाट घरीही आलं. जेव्हा या महिलेने कपाट उघडलं तेव्हा तिचे डोळे चमकून गेले… असं काय होतं त्या कपाटात?
विचार करा. तुम्ही एखादी सेकंड हँड गोष्ट खरेदी करून घरी आणली. त्यात मार्केटमध्ये अत्यंत किंमती समजली जाणारी एखादी वस्तू सापडली तर तुम्हाला कसं वाटेल? या महिलेसोबत असंच काहीसं झालं, जेव्हा तिने सेकंड हँड कपाट खरेदी केलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या महिलेला या कपाटात किंमती खजिना सापडला. विशेष म्हणजे तिला असं काही सापडेल आणि आपली कायमची गरीबी दूर होईल याची कल्पनाही नव्हती.
अमांडा डेव्हिट असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने तिची ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमांडा अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहते. ती म्हणते, मी फेसबुक पेजवरून जुने फर्निचर खरेदी केले. त्यात एक अँटिक कपाट होतं. खरं तर या कपाटाची किंमत लाखांमध्ये असते. मी या कपाटाचा भाव कमी जास्त करून ते घेतलं. कपाटाची डिलिव्हरीही झाली. जेव्हा मी कपाटाचा दरवाजा उघडाल तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटलं. या कपाटात 13 नारंगी आणि निळे चमकदार बॉक्स होते. हे सर्व बॉक्झ लक्झरी ब्रँड Hermesचे होते. तर निळा बॉक्स Tiffany’s चा होता.
त्यापेक्षा अधिक महागडं सामान मिळालं
सर्व बॉक्स उघडल्यावर तिला त्यात 12 प्लेट्स दिसल्या. या सर्व प्लेट्स उत्तम स्थितीत होत्या. प्रत्येकावर सोनरी नमुने छापले होते आणि हे छोटे-लहान प्लेट्सचं एक संपूर्ण सेट होता. या कलेक्शनमुळे ही महिला खूप खुश झाली. कारण हे प्लेट्स खूप महाग होते. तिने कॅबिनेट विकणाऱ्याला याबद्दल काहीही सांगितले नाही. कारण तिला भिती होती की जर हे काही चुकून ठेवले असतील तर ते परत मागितले जाऊ शकतात. तिच्या या स्टोरीनंतर, इतर लोकांनी देखील सांगितले की त्यांनाही इतर लोकांकडून खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या.