CCTV Video: एका बाजूनं बस आली, तिच्यापुढं बाईक सुसाट, मधात थेट पोराची सायकल घुसली, दैवावर विश्वास ठेवायला लावणारी घटना कॅमेऱ्यात कैद
मराठी मध्ये एक प्रसिद्ध अशी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भीषण अपघातातून एक मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. या अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीमध्ये (marathi) एक प्रसिद्ध अशी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भीषण अपघातातून एक मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. या अपघाताचा (accident) व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ही घटना केरळमधील कन्नूरच्या तळीपरंबाज परिसरातील आहे. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. हा मुलगा त्याच्या सायकलवर घाई-घाईत रस्त्या क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता. रस्ता क्रॉस करताना समोरून अचानक एक दुचाकी आली, हा मुलगा या दुचाकीला धडकला. मात्र दुचाकीच्या मागून एक बस देखील येत होती. दुचाकीची धडक बसल्याने हा मुलगा बसच्या पुढे जाऊन पडला तर या मुलाची सायकल बसच्या चाकाखाली आली. अपघातात सापडलेल्या या सायकलचा चुराडा झाला आहे. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की, हा अपघात किती भीषण होता.
देव तारी त्याला कोण मारी! pic.twitter.com/TKWJT5HudV
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2022
…म्हणून मुलगा वाचला
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलाग हा त्याच्या सायकलवर रस्ता क्रॉस करत आहे. तेवढ्यात तो समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकला. दुचाकीच्या पाठीमागून एक बस देखील येत होती, हा मुलगा दुचाकीला धडकल्याने तो बसच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला, तर त्याची सायकल बसच्या चाकाखाली आली. या सायकचा चुराडा झाला आहे. यावरून हा अपघात किती भिषण होता याची कल्पाना येते.
कमेंटचा पाऊस
दरम्यान या अपघाताचा व्हिडीओ पाहून अनेकांनी अश्चर्य व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडत आहे. एका युजरने हा व्हिडीओ पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अन्य एका युजरने देव तारी त्याला कोण मारी! असे म्हटले आहे, खरोखरच हा मुलगा आश्चर्यकारक रित्या या अपघातातून वाचला आहे.
संबंधित बातम्या
बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा ‘हा’ Viral video
केळाची सालं रस्त्यावर फेकणाऱ्यांना काय सांगतेय ही चिमुकली? Video viral
म्हशीशी सामना करणं सिंहाला पडलं भारी! जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, Video viral