video : हिंस्र प्राण्याला जवळ पाहून हरिणाने केली जबरदस्त अ‍ॅक्टींग, मरण्याचे नाटक रचत केले पलायन

जंगलात दोन शिकारी जनावरांच्या तावडीत सापडलेल्या एका छोट्या हरणाने कशी एक्टींग करीत स्वत: ची सुटका करून घेतली हे पाहणे मजेशीर आहे.

video : हिंस्र प्राण्याला जवळ पाहून हरिणाने केली जबरदस्त अ‍ॅक्टींग, मरण्याचे नाटक रचत केले पलायन
acting
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 6:01 PM

Deer Acting Video : देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे.  जेव्हा संकट येते तेव्हा त्यातून बचाव करण्यासाठी प्रत्येक जीव निकराचा प्रयत्न करीत असतो. परंतू हरणासारख्या  एका छोट्या प्राण्याने दोन – दोन खतरनाक शिकारी आजूबाजूला वावरत असताना त्यांच्या तावडीतून कशी स्वत: च्या बुद्धी चातुर्याने कशी सुटका करून घेतली त्याचा एक मजेशीर व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका हरणाने त्याच्या जीवावर आलेले संकट कसे हुशारी वापरून दूर केले ते पाहणे गमतीशीर आहे.

हरिणाने केले मरण्याची अ‍ॅक्टींग

वाईल्ड लाईफ संबंधित एका व्हिडीओने समाजमाध्यमावर चांगलीच धमाम केली आहे. नेटवरील युजर हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत. या व्हिडीओमध्ये एका गरीब हरणाला चित्ता आणि तरसाने (Hyena) घेरल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या जवळ दोन – दोन शिकाऱ्यांना पाहून या हरिणाला एवढ्या संकटातही एक योजना सुचते. त्याबरहूम तो मरणाची मस्त अ‍ॅक्टींग करतो. यातून त्याचा प्राण तर वाचतोच. शिवाय दोन-दोन जंगली शिकाऱ्याच्या तावडीतून त्याची सुटका होते. दोन – दोन शिकाऱ्यांना स्वत: जवळ आलेले पाहून हे हरिण मस्तपैकी मरण्याची एक्टींग करते आणि या हिंस्र प्राण्याच्या तावडीतून स्वत: ची सुटका करून घेते. हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहू शकता.

अ‍ॅण्ड ऑस्कर गोज टू !

आपण पाहिले असेल की जंगलातील बहुतांशी हिंस्र जनावरे हरणासारख्या कमजोर प्राण्याची शिकार करीत असतात. वाघ, सिंह आणि चित्ते किंवा बिबटे हरणांचा पाठलाग करीत शिकार करीत असतात. अनेक वेळा हरीणाची शिकार ते आरामात करीत असतात. हरिणाला त्यांच्या तावडीतून सहज सुटका करून घेता येत नाही. तर काही वेळा आपल्या कौशल्याने हरिणासारखे छोटे प्राणी मोठ्या हिंस्र प्राण्याच्या तावडीतून सटुका करीत असतात. व्हायरल व्हायरल व्हिडीओमध्ये असेच काही पहायला मिळेल. आपण पाहू शकता की चित्ता आणि तरसा यांच्या तावडीत घेरलेले कमजोर हरिण या दोघांना पाहून जमिनीवर निपचित पडून रहाते. आणि मरण्याची बेमालूमपणे एक्टींग करते. त्यामुळे तरस त्याला मेलेला समजून थोडा बेसावध होतो. त्यातच चित्त्याला हाकलण्याच्या नादात तरसाचे लक्ष विचलित झाल्याचे पाहून हरीण लगेच टुणकन उडी मारून पळून जाते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.