Video | कारचा अपघात झाला की थेट आकाशातून पडली, विचित्र अपघात पाहून नेटकरी म्हणतात…
Viral Accident Video | एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नेमका हा अपघात कसा झाला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई : सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ भयानक (Terrible Accident Video) असतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो एवढं मात्र नक्की. कारण मागच्या काही दिवसांपासून इतके भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कारचा अपघात नेमका कसा झाला असेल असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर अपघात कसा झाला असेल हे कमेंटमध्ये (comment) नक्की सांगा.
त्या कारचा अपघात झाल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसणार आहे. त्यानंतर तुमच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतील. जसं की हे झालं तर कसं झालं असेल. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, अपघात झालेली कार डायरेक्ट खांब्यावर कशी पडली. गाडीच्या मधून खांबा निघाल्याने नेमकं काय झालं असावं. हा विचार करणं इतकं भयानक आहे. हा ज्यांनी अपघात पाहिला आहे.ते गाडीचं आजूबाजूनं निरीक्षण करीत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा विचार करत बसणार, अनेकांनी कार आकाशातून पडली असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीचे अपघात क्वचित पाहायला मिळतात.
I have so many questions pic.twitter.com/JrXmBjw5uP
— Clown World ™ ? (@ClownWorld_) April 19, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लटफॉर्मवरती शेअर झाला आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @ClownWorld_ नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे आणि शेअर सुध्दा केला आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ आठ सेंकदाचा आहे, हा व्हिडीओ 5.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘अहो, बंपरने खांब तुटला असावा, वरचा भाग नंतर हुडवरून उडाला आणि खाली येताना विंडशील्डमधून गेला.’ दुसर्या युजरने लिहिले, कार आकाशातून पडली, चेसिस आधी उतरली आणि झाडावर पडली. मी असा विचार करणे योग्य आहे का?’