पठ्ठयाने घेतली चक्क चित्त्यासोबत सेल्फी, नेटकरी विचारताहेत ‘भावा आहेस की खपला?’
सेल्फी घेण्याचा एखाद्याला किती नाद असू शकतो? एका पठ्ठयाने चक्क चित्त्यासोबत सेल्फी घेतली . त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई, काही लोकांसाठी सेल्फी (Selfie) म्हणजे जीव की प्राण असतो. सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावल्याच्या घटना देखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. कधी धोकादायक ठिकाणी तर कधी वन्य प्राण्यंसोबत सेल्फीच्या नादात अनेकांचे बळी गेल्याच्या घटना आपण ऐकतो. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. जंगल सफारी राईड दरम्यान निसर्ग जवळून जाणून घेण्याची संधी मिळते. यादरम्यान वन्य प्राण्यांनाही जवळून पाहता येते, बऱ्याचदा वन्य प्राणी अगदी जवळ येतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चित्ता (Cheetah) येतो आणि सफारी जीपवर स्वार होतो आणि एक माणूस चित्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमचा देखील श्वास रोखला जाईल.
चित्ता बसला गाडीवर
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक सफारी जीप जंगलात उभी आहे. पर्यटकांनी भरलेली सफारी जीपच्या दिशेने चित्ता येत असल्याचे दिसते. पुढे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, चित्ता उडी मारून जीपच्या छतावर बसतो. या दरम्यान, चित्ता देखील सन रूफवरून आत डोकावण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर अलगदपणे आणि एका बाजूला बसतो. दरम्यान, जीपमध्ये बसलेले सर्व पर्यटक घाबरतात, परंतु सफारी मार्गदर्शकांपैकी एक आपल्या जागेवरून उठतो आणि चित्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात करतो.
African Selfie…Cheetah style pic.twitter.com/WnOHkB5J9D
— Clement Ben IFS (@ben_ifs) September 21, 2022
नेटकरी विचारत आहेत ‘भावा आहेस की खपला?’
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडतो आहे. काही जणांनी याला यमराजासोबतची सेल्फी म्हटले आहे तर काहींनी याला मूर्खपणा देखील म्हंटले आहे. एकाने तर याला चक्क आता जिवंत आहेस का? असेही विचारले आहे.